बारावीच्या गुणवंत मुलींचा रोप देऊन सत्कार युवकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्यास बदल घडणार -नाना डोंगरे


बारावीच्या गुणवंत मुलींचा रोप देऊन सत्कार   युवकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्यास बदल घडणार -नाना डोंगरे

वाळकी (प्रतिनिधी विजय भालसिंग) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनींचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने रोप देऊन सत्कार करण्यात आला. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी गुणवंत विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. 

पूजा सुरेश अंधारे (रेसिडेन्शिअल विद्यालय), कुमारी येवले (न्यू आर्टस महाविद्यालय), तृप्ती काळे, अक्षदा काळे, काजल निकम, सुप्रिया पाचारणे (हनुमान विद्यालय, टाकळी खातगाव ) या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार रोप देऊन केला. यावेळी सुरेश अंधारे, सारिका अंधारे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, पै.विकास निकम, मयुर काळे, बाबासाहेब काळे आदि उपस्थित होते. पै.नाना डोंगरे म्हणाले की, युवा पिढीमध्ये पर्यावरण चळवळ रुजण्याची गरज आहे. युवकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्यास बदल घडणार आहे. बारावीच्या परीक्षेत मुलींनी आपली गुणवत्ता सिध्द केली असून, मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. या मुलींचा रोप देऊन सन्मान करण्यात आला असून, त्यांना पर्यावरण संवर्धन चळवळीत पुढाकार घेण्याचे आवाहन देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News