भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे : उपशिक्षणाधिकारी संजय मेहेर


भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे : उपशिक्षणाधिकारी संजय मेहेर

स्नेहबंध तर्फे आनंदऋषिजी अपंग कल्याण केंद्र येथे वृक्षारोपण

अहमदनगर -(संजय सावंत) भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी संजय मेहेर यांनी केले.

स्नेहबंध फाउंडेशन तर्फे आनंदऋषिजी अपंग कल्याण केंद्र, नेप्ती येथे उपशिक्षणाधिकारी संजय मेहेर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, आनंदऋषिजी अपंग कल्याण केंद्र चे प्रमुख रावसाहेब झावरे, संजय शिंदेसर, व्यवस्थापक काकासाहेब बारवकर, सचिन तरवडे, हेमंत ढाकेफळकर आदी उपस्थित होते

यावेळी मेहेर म्हणाले घराच्या जवळ, घराच्या गल्लीमध्ये, गार्डनमध्ये, रस्त्याच्या दुतर्फा जिथे जागा असेल तेथे झाडे लावा आणि या मोहिमेत सहभागी व्हा. नुसते झाडे लावून भागणार नाही, तर ती जगवणे आणि त्यांचे संर्वधन करणेही गरजेच आहे. यामुळे निसर्गामध्ये संतुलन राखला जाईल आणि आपला उद्याचा काळ सुरक्षित होईल असेही ते म्हणाले. यावेळी मेहेर यांनी वृक्षारोपणाचे महत्व विशद करणारी "वन है तो जल है आणि जल है तो मनुष्य का कल है" असे सांगितले. स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, मागील तीन वर्षामध्ये अहमदनगर जिल्हयामधे आतापर्यंत भरपूर झाडे लावण्यात आलेली असून यावर्षी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त झाडे लावू आणि वृक्षरोपणामध्ये अहमदनगर जिल्हा इतरांसाठी एक आदर्श म्हणून पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News