नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथी साजरी


नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथी साजरी

सावता महाराजांचे कार्य आभाळा एवढे उंचीचे -आ. निलेश लंके

वाळकी विजय भालसिंग(प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील संत सावता महाराज मंदिरात संतश्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त सावता परिषद, माळी समाज व ग्रामस्थांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुण्यतिथी निमित्त मंदिराच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मंदिर परिसर स्वच्छ करुन सडा टाकून, आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. संत सावता महाराजांच्या मुर्ती भोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. नंदकुमार देशपांडे यांच्या हस्ते संत सावता महाराजांच्या मुर्तीस अभिषेक घालण्यात आला. आमदार निलेश लंके यांच्या हस्ते मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आरती करण्यात आली. ग्रामस्थांनी कांदा, मुळा, भाजी, भाकरीचा नैवैद्य दाखवून दर्शन घेतले. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी पं. स. सदस्य देवा (किसन) होले, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, ओबीसीचे नेते रामदास फुले, प्रा.एकनाथ होले, भानुदास फुले, संतोष बेल्हेकर, कैलास होले, शाहू होले, अमित होले, रामदास होले, रोहीदास भुजबळ, नानासाहेब बेल्हेकर, दिनेश फुले, तुकाराम चौरे, शिवाजी कळमकर, तुषार भुजबळ, अशोक राऊत, राजेंद्र पुंड, अक्षय चौरे आदि उपस्थित होते. आमदार निलेश लंके म्हणाले की, कांदा, मुळ्याची शेती फुलवून खरा भक्ती मार्ग दाखविणारे सावता महाराजांचे कार्य आभाळा एवढे उंचीचे आहे. त्यांचे विचार अंगीकारले तर समाजामध्ये घडणार्‍या घटना टळतील. त्यामुळे त्यांचे विचार आता समाजातील प्रत्येकाने अंगीकारायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News