यवत. पुणे प्रतिनिधी: विठ्ठल होले
तालुक्यात आज कोरोणाने कहरच केला आहे,यवत राहू परिसरात तब्बल 28 रुग्ण आढळले असल्याचे दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक राज गे यांनी सांगितले. लॉक डाऊन काळात लग्न समारंभ भरपूर प्रमाणात पार पडत आहेत, खर्च कमी आणि रुसवे फुगवे नाहीत त्यामुळे लोक लग्न करीत आहेत परंतू त्याचा परिणाम आज दौंड तालुक्यातील कासूर्डी गावात एकाच कुटुंबातील नवरा नवरी सह 17 नातेवाईकांना कोरोनची लागण झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नातेवाईकांच्या चिंतेत भर पडली आहे,तर त्या परिसरातील बोरी भडक चंदनवाडी येथे चार रुग्ण आढळले आहेत, तर पाटस येथील दोन दिवसापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नी,मुलगी आणि जावई असे तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे, राजेगाव येथील एक, वाटलुज एक आणि सहजपुर येथील एक व्यक्ती कोरोना बाधीत आढळले असल्याचे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले,लोकांनी लग्न समारंभ,अंत्यविधी याठिकाणी गर्दी करणे टाळले पाहिजे, अशा गर्दीच्या ठिकाणी हा संसर्ग पसरत असल्याने लोकांनी काळजी घेणे काळाची गरज आहे,अशी आकडेवारी वाढत राहिली तर ही दौंड तालुक्यासाठी गंभीर बाब आहे.