गायीच्या दुधाला लिटरला 10रू आणि पावडरला किलोला 50 रुपये अनुदान मिळावे अन्यथा 1 आगस्टला राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन::भाजप, रासप


गायीच्या दुधाला लिटरला 10रू आणि पावडरला किलोला 50 रुपये अनुदान मिळावे अन्यथा 1 आगस्टला राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन::भाजप, रासप

पुणे (प्रतिनिधी) विठ्ठल होले:

तहसील कार्यालयात तहसीलदार संजय पाटील यांना रासप,भाजप,रयत क्रांती संघटना,शिवसंग्राम आणि आर पी आय यांच्या वतीने दुधाला कायम अनुदान मिळावे अन्यथा 1 आगस्टला राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद केले आहे रासपच्या वतीने यापूर्वी दूध दरवाढी बाबत संपूर्ण महाराष्ट्रात तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले होते,एक महिन्यानंतर राज्यभर पांडुरंगाला दुग्ध अभिषेक घालून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले परंतू सरकार दूध दरवाढी कडे लक्ष देत नाही,आजच्या निवेदनातून हेच सरकारला सांगायचे आहे की लॉक डाऊन काळात शेतकरी बांधव अडचणीत आला आहे,सध्या राज्यभरात 1कोटी 40 लाख लिटर गायीचे दूध उत्पादित होते,त्यापैकी 35 लाख लिटर दूध सहकारी संस्था कडून खरेदी केले जाते,90 लाख लिटर दूध खाजगी संस्था,डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते,15 लाख लिटर दूध हॉटेल्स,ग्राहक यांना स्वतः शेतकरी पोहोच करतात,शासकीय योजनेद्वारे फक्त एक लाख लिटर दूध घेतले जाते, लॉक डाऊन काळात दूध विक्री 30% घट झाली आहे,सहकारी दूध संघ,खाजगी संस्था शेतकऱ्याकडून 15 ते 16 रुपये दराने खरेदी करत आहेत त्यामुळे दुधाचा खर्च ही निघत नाही,शासनाने 10 लाख लिटर दूध 25 रुपये दराने घेण्याची घोषणा केली होती,शासन फक्त 7 लिटर दूध खरेदी करत आहेत त्यामुळे गायीच्या दुधाला प्रती लिटर 10 रुपये अनुदान आणि पावड रला 50 रुपये अनुदान व शासनाने प्रती लिटर 30 रुपये दराने दूध खरेदी करावे अशी आमची योग्य व न्यायिक मागणी असून यावर तत्काळ तोडगा निघाला नाही तर महायुतीच्या  वतीने एक आगस्ट रोजी  राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसील संजय पाटील यांना देण्यात आले,यावेळी वासुदेव काळे,हरीश खोमणे,तानाजी दिवेकर,भानुदास शिंदे,सर्फराज शेख,नागेश बेलुरकर इतर मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News