थोडंसं मनातलं..... "असुन अडचण आणि नसुन खोळंबा"...ॲड शिवाजी कराळे


थोडंसं मनातलं.....  "असुन अडचण आणि नसुन खोळंबा"...ॲड शिवाजी कराळे

नमस्कार मित्रहो, 

अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रसार सध्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावात सुद्धा आता कोविड-19 चा प्रसार होतोय. जिल्ह्यातील काही गावांनी स्वतः होउन लाॅकडाऊन जाहीर केला आहे. जरी कोविड-19 ची संख्या वाढत असली तरी प्रशासनाचे अथक परिश्रमामुळे अनेक रूग्णांनी कोविड-19 वर मात केली आहे, त्या मुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. फक्त ग्रामीण आणि शहरी भागात सुद्धा रूग्णांची तपासणी करण्या बाबतीत अनेक अडचणी निर्माण झाल्याने जनता संभ्रमित झाली आहे. ग्रामीण भागातील लोकांना किरकोळ सर्दी खोकला आला तरी काही डाॅक्टर मंडळी डायरेक्ट कोविड-19 ची चाचणी करण्याचा सल्ला रूग्णांना देतात आणि त्यामुळे जनता घाबरून जाते. आता तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील कोविड-19 ची वाढती संख्या पहाता जनता घाबरून गेलेली आहे. तशातच जिल्हा रूग्णालयातुन लोकांना कोविड-19 चे तपासणी अहवाल लवकर मिळत नाहीत. त्यामुळे लोक अजुनच घाबरून जातात. कधी कधी तर रूग्ण मयत झाल्यानंतर व त्यांचेवर अंत्यसंस्कार केल्यावर त्यांचे रिपोर्ट पाॅजिटीव्ह आलेले आहेत अशा घटना सुद्धा घडल्या आहेत. एवढेच नाही तर काल परवा एका रूग्णांला त्रास होऊ लागल्याने शहरातील खाजगी दवाखान्यात कोविड-19 ची चाचणी केली असता त्यांचा चाचणी अहवाल पाॅजिटीव्ह आला आणि नंतर सरकारी दवाखान्यात चाचणी केली असता चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, या बाबतीत वर्तमानपत्रात सुद्धा बातमी छापून आली आहे. मग अशा निष्काळजीपणा करणा-या खाजगी दवाखान्यावर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासन काही कारवाई करील की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. नाहीतरी असे कितीतरी अपप्रकार घडतात आणि त्यांना पाठीशी घालण्याची परंपरा जुनीच आहे.  तसेच जिल्हा सरकारी दवाखान्यात सुध्दा एक कोरोना बाधीत रूग्ण मयत झाल्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर इतर सर्व सामान्य रूग्णाचे जवळ ठेवल्या बाबतीत ही घटना पेशंट चे नातेवाईकांनी उघड केली आहे. अगोदरच कोविड-19 ची वाढती संख्या आणि त्यात दवाखान्यातील हलगर्जीपणा म्हणजे "असुन अडचण आणि नसुन खोळंबा" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी शहरातील 

खाजगी हाॅस्पिटल मध्ये इतर आजाराचे पेशंट कमी अधीक प्रमाणात व फारच अर्जंट शस्रक्रिया करणे गरजेचे असेल तरच ॲडमिट केले जातात. परंतु ज्या लोकांना कोविड-19 चे सारखे लक्षणे दिसू लागली की त्वरित ते प्रथम खाजगी दवाखान्यात उपचार घ्यायचे म्हणून भरती होतात. परंतु आता सध्या सरळ सरळ प्रथमतः कोविड-19 चीच चाचणी करण्याचा सल्ला रूग्णांना दिला जातो. तसेच कोविड-19 चे चाचणी साठी शासनाने ठरवून दिलेल्या दरा पेक्षा जास्त दर आकारला जातो या बाबतीत पण महाराष्ट्रासह प्रत्येक जिल्ह्यात ही समस्या निर्माण झाली आहे. अगदी पीपीई किट, हॅन्डग्लोज चे पैसे सुद्धा पेशंट कडूनच वसूल केले जातात. सरकारकडे अशा प्रकारे तक्रारी आल्या नंतर सरकारने त्याची शहनिशा केली आहे व त्यात सत्यता आढल्या नंतर अनेक पेशंटला जवळपास दिडकोटी रूपये परत द्यावे लागले आहेत. सध्या महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी महात्मा फुले आरोग्य सेवा स्किम सरकारने सुरू केली आहे. तसेच काही लोकांचे आरोग्य विमा योजना सुद्धा आहेत. परंतु तरीही खाजगी दवाखान्यात रूग्णाची हेळसांड होतेच. कधी कधी विमा पॉलिसी असुन सुद्धा डाॅक्टर जास्त पैसे जमा करण्याचे आदेश देतात या बाबतीत सुद्धा वर्तमानपत्रात वाचून समजले.  याकडे सरकारने व जिल्हा प्रशासन यांनी लक्ष दिले पाहिजे. चार पाच दिवसापूर्वी मुंबई मध्ये एक रूग्ण कोविड-19 ने मयत झाला होता, त्याचे बील हिरानंदानी हाॅस्पिटल ने आठ लाख रुपये केले आणि आठ लाख रुपये भरीत नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला नाही. सध्याचा लाॅकडाऊन चा काळ पहाता जनता अर्थिक दृष्टीने हैराण झालेली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेकडे खाजगी दवाखान्यात  कोविड-19 चे उपचार घेण्यासाठी पैसा नसतो. त्यामुळे खाजगी दवाखाने यांनी महात्मा फुले आरोग्य स्किम आणि आरोग्य विमा योजना यांचे द्वारेच उपचार करावेत असे आदेश सरकारने व जिल्हा प्रशासन यांनी प्रत्येक खाजगी दवाखाने यांचेवर बंधनकारक केले पाहिजेत. 

तसेच सरकारी दवाखान्यातील डाॅक्टर कडून चालणारा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा यावर कारवाई केली पाहिजे. अहमदनगर शहरातील राखीव असलेली  जवळपास सर्व दवाखाने कोविड-19 चे पेशंट ने फुल्ल भरलेली आहेत. तशातच दररोज नवीन नवीन कोरोना बाधीत सापडणे हे खरोखरच धोकादायक ठरू शकते. हे सगळं टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी अहमदनगर मधील सुप्रसिद्ध असे नाट्यकर्मी यांचे मदतीने व त्यांचे चांगल्या संकल्पनेची मदत घेऊन  कोविड-19 वर "पथनाट्य" चे सादरीकरण करून चांगल्या प्रकारे जनजागृती करता येईल का, या बाबतीत प्रशासनाचे अधिकारी यांनी निश्चितच विचार करणे आवश्यक आहे. सध्या अहमदनगर शहरात कोरोना घुसलाय, त्याची बाधा महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग यांना सुद्धा झालेली आहे. आता हलगर्जीपणा करून चालणार नाही, त्या साठी योग्य ते अधिकार वापरून उपाययोजना करणे गरजेचे आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या, केवळ सर्दी खोकला आला म्हणून घाबरून न जाता योग्य तपासणी करून घेतली पाहिजे. या निमित्ताने अहमदनगर जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना एकच विनंती आहे की, गोरगरीब आणि सर्व सामान्य जनतेच्या अर्थिक अडचणी लक्षात घेऊन त्यांना शासकीय योजना मधून मोफत उपचार करण्यासाठी सुचना खाजगी व सरकारमान्य दवाखान्यांना देण्यात यावी ही नम्र विनंती आहे. नागरिकांनी सुद्धा समाजमाध्यमावर आलेल्या  कोणत्याही आफवेला बळी न पडता  आपल्या परिवाराची काळजी घ्यावी हि विनंती आहे, तसेच शासकीय सूचना चे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती. घरीच रहा सुरक्षित रहा. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर 

99 22 545 545

जाहिरात
Search
विडिओ
Recent News