अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे इंदापूरात होणारे राज्यस्तरीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे इंदापूरात होणारे राज्यस्तरीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले

 इंदापूर काकासाहेब मांढरे (प्रतिनिधी)

 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन इंदापूर ( जि. पुणे ) येथे ऑगस्ट महिन्यात घेण्याचे ठरले होते. मात्र कोरोना महामारीच्या जिल्हाबंदीमुळे सदरचे नियोजित अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस अरुणकुमार एस. मुंदडा यांनी दिली.

या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे सामान्य प्रशासन राज्य मंत्री  दत्तात्रय भरणे होते. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एम. डी. शेख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची आज ( ता.१८) झुम मिटिंग झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

यावेळी मुंदडा यांनी 4 एम. डी. शेख यांची राज्यपाल नियुक्त केल्या जाणाऱ्या 12 जागांपैकी एका जागेवर पत्रकार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी असा ठराव मांडला. त्यास परिषदेचे कोषाध्यक्ष वाय. ए.सिद्दीकी तसेच कार्यकारिणी सदस्य डॉ. संदेश शहा यांनी अनुमोदन दिले. शेख यांची नियुक्ती होण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार,  उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना परिषदेच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले. कोरोना जिल्हाबंदी उठल्यानंतर इंदापुरात राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचे ठरले. सूत्रसंचालन परिषदेचे पुणे जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News