वाळकी विजय भालसिंग(प्रतिनिधी)- गुंडेगाव (ता. नगर) येथे कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर गावातील ग्रामस्थांना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मोफत होमिओपॅथीच्या आर्सेनिक अल्बम- 30 औषधाचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांच्या हस्ते ग्रामस्थांना आर्सेनिक गोळ्याचे वाटप झाले.
गुंडेगावात बंदोबस्तासाठी असलेले पोलीसांना या गोळ्याचे वाटप करुन या उपक्रमाचे प्रारंभ करण्यात आले. येत्या दोन दिवसात गुंडेगावला प्रत्येकाच्या घरोघरी आर्सेनिक गोळ्याचे वाटप होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक भापकर गुरुजी यांच्या प्रेरणेने गावातील युवकांनी स्वखर्चाने घराघरात आर्सेनिक गोळ्या वाटपचा उपक्रम हाती घेतला आहे. युवकांनी सामाजिक बांधिलकीने घेतलेल्या उपक्रमाचे भापकर गुरुजी यांनी कौतुक केले. यावेळी पो.कॉ. ससाणे, संजय भापकर, सचिन जाधव, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण कुताळ, भाऊसाहेब शिंदे, दादा जावळे, दादासाहेब आगळे, रामदास सकट (कोतवाल) उपस्थित होते. गुंडेगाव (ता. नगर) येथे कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर गावातील ग्रामस्थांना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मोफत होमिओपॅथीच्या आर्सेनिक गोळ्याचे वाटप करताना ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी समवेत पो.कॉ. ससाणे, संजय भापकर, सचिन जाधव, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण कुताळ, भाऊसाहेब शिंदे, दादा जावळे, दादासाहेब आगळे, रामदास सकट (कोतवाल) आदि.