अमरापूर कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम


अमरापूर कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा  कायम

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण    शेवगाव, दि. 18 : एफ.डी.एल शेवगावचे,अमरापूर माध्य व उच्च माध्यमिक अमरापूर विद्यालयाच्या एच एस सी बोर्ड पुणे यांचेकडून घेण्यात आलेल्या 12 वी चा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत विद्यालयातील  विज्ञान शाखेत  प्रथम क्रमांक प्राप्त  विद्यार्थीनी कुमारी.पोटफोडे वैष्णवी राजकुमार 86.92% द्वितीय क्रमांक कुमारी.पोटफोडे अमृता संजय 84.92% तृतीय क्रमांक कुमारी.ढमाळ श्रध्दा बाबासाहेब 82.00% असे गुण प्राप्त करून  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तसेच कला शाखेत प्रथम क्रमांक कुमारी साठे सुवर्णा किसन 79.69% द्वितीय क्रमांक कुमारी इनामदार करिश्मा हुसेन 75.23%  तृतीय क्रमांक कुमारी म्हस्के सोनाली सुरेश 74.61%  या विद्यार्थ्यांच्या यशामागे विद्यालयाचे  प्राचार्य श्री. राजू मगर सर व सर्व प्राध्यापक व शिक्षक वर्ग यांचे  मार्गदर्शन मिळाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अँड. श्री.विद्याधरजी काकडे , जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे , संस्थेचे शैक्षणिक विभाग प्रमुख  श्री लक्ष्मणराव बिटाळ , विद्यालयाचे समन्वयक  श्री.अन्नदाते सर यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News