कोरोना महामारीच्या आपत्ती काळात येथील सेवानिवृत्त


कोरोना महामारीच्या आपत्ती काळात येथील सेवानिवृत्त

कोरोना संकट काळात उपाययोजनांसाठी 11 हजार रूपयांचे योगदान दिल्याबद्दल सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्नेहलता लबडे यांचे अभिनंदनाचे पत्र देऊन गौरव करताना तहसिलदार अर्चना भाकड- पागीरे.

शेवगाव (प्रतिनिधी) सज्जात पठाण

मुख्याध्यापिका व रोटरीच्या सदस्या स्नेहलता रवींद्र लबडे  यांनी आपत्ती उपाययोजनांची माहिती कळताच सामाजिक बांधिलकीने 11 हजार रूपये उपाययोजनांच्या साहित्य खरेदीसाठी दिले. सढळ हस्ते केलेल्या या योगदानाबद्दल तहसिलदार अर्चना भाकड - पागिरे यांनी अभिनंदनाचे पत्र देऊन लबडे यांचा गौरव केला.

निस्सिम भावनेने व तत्परतेने केलेल्या  मदतीची  दखल घेत  सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्नेहलता लबडे  या  अभिनंदनास पात्र असल्याचे गौरवोद्गार तहसिलदार भाकड काढले. मुख्याध्यापिका स्नेहलता लबडे यांनी याआधी रोटरीच्या शेवगाव येथील ऑक्सिजन पार्क साठी 51 हजार रुपयांची मदत केली होती.तसेच गत वर्षी पूरग्रस्तांना मदत देऊन मागे परतताना अपघातात डोळा गमवणाऱ्या प्रभुवडगाव ( ता. शेवगाव ) येथील युवकाला 11 हजार रुपये मदत केली होती. सुमारे 15 गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. 

 जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, पं. स. सभापती डॉ. क्षितीज घुले, बाजार समितीचे संचालक संजय कोळगे, डॉ. संजय लड्डा,  रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सचिव बाळासाहेब चौधरी, प्रा. दिलीप फलके, गटविकास अधिकारी महेश डोके,   नायब तहसिलदार मयूर बेरड, भानुदास गुंजाळ,  सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सलमा हिराणी, गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, सुरेश पाटेकर, रमेश गोरे,  संतोष गर्जे, मनोज जाधव, वसीम शेख आदिंनी लबडे यांच्या अर्थिक मदतीचे कौतुक केले.जाहिरात
Search
विडिओ
Recent News