दौंड शुगर कारखाना कॉलनीत एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण


 दौंड शुगर कारखाना कॉलनीत एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण

विठ्ठल होले पुणे 

दौंड प्रतिनिधी::दौंड तालुक्यात कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे,आज अलेगाव तालुका दौंड येथील दौंड शुगर कारखाना कॉलनीत एकाच कुटुंबातील चौघांना लागण झाल्याचे दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले.दौंड शुगर कारखाना परिसरातील 36 जणांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी एकाच कुटुंबातील चौघांना लागण झाली आहे पती पत्नी व दोन मुले कोरोनचे शिकार झाले आहेत, कोरोना संसर्ग आता छोट्या छोट्या गावात पोहोचत आहे त्यामुळे चिंता वाढत असून त्यावर ठोस पावले उचलून गाव पातळीवर कडक निर्बंध लागू करणे गरजेचे आहे,यासाठी   अपडाऊन करणारे लोकांवर निर्बंध घातले जावेत,विना मास्क फिरणारे,विनाकारण शहरात जाणारे,या लोकांवर गावपातळीवर कडक निर्बंध घातले पाहिजेत,त्यांच्यावर ग्रामपंचायत मार्फत दंडात्मक कारवाईची गरज आहे, अन्यथा कोरोनाचा संसर्ग वाढतच जाणार आहे.आणि ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांसाठी चींतेची  बाब आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News