डोंगरे बहुद्देशीय संस्था व निसर्ग व सामाजिक पर्यावरण, प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने भैय्या बॉक्सर यांचा सन्मान


डोंगरे बहुद्देशीय संस्था व निसर्ग व सामाजिक पर्यावरण, प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने भैय्या बॉक्सर यांचा सन्मान

लॉकडाऊन काळात गरजूंना दिला आधार 

वाळकी विजय भालसिंग(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात गरजू व गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तू पुरविणार्‍या व विविध सामाजिक उपक्रम राबविणारे हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांचा  स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर, परशुराम केंजरला, साहिल बागवान, शाहरुख शेख आदि उपस्थित होते.

हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांनी निस्वार्थ भावनेने कोरोनाच्या संकटकाळात अनेक गरजूंना अन्न, धान्य व किराणा किटची मदत दिली. शहरात फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना आधार मिळाला. सामाजिक भावनेने कार्य करणार्‍या व्यक्तींमुळे समाजातील प्रश्‍न काही प्रमाणात सुटत असल्याची भावना पै.नाना डोंगरे यांनी व्यक्त केली. भैय्या बॉक्सर यांनी हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली व युवकांना या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News