श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथील मंदिरात सकाळी अभिषेक, पूजा, आरती पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
नगर (प्रतिनिधी) संजय सावंत- संत सावता महाराज हे ज्येष्ठ संत होते. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. "कांदा-मुळा-भाजी... अवघी विठाई माझी"अशा अभंगातून ऐहिक जीवनात कर्तव्य कर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. असे ते मानत. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांनी दाखविलेल्या मार्गने भक्ती केल्यास ईश्वराच्या आपण जवळ जातो. अशा महान संतांचे चरित्र अभ्यासले पाहिजे, असे संत वचन श्री विशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराजांनी सांगितले. माळीवाडा येथील श्री संत सावता महाराज विठ्ठल-रुख्मीणी मंदिर येथे शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, सावता महाराज उत्सव समितीचे प्रमुख छबूनाना जाधव, कैलास खरपुडे, सतीश डागवाले, बाळासाहेब पुुंड, अशोक कापरे, चंद्रकांत ताठे, अनिल चेडे, दत्ता जाधव, जालिंदर बोरुडे, बाळासाहेब आगरकर, गणेश राऊत आदिंसह भजनी मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली असल्याने आज विशेष पुजा करण्यात आली. यावेळी मोजकेच भाविक उपस्थित होते.
याप्रसंगी संगमनाथ महाराजांनी लवकरच कोरोतून श्री विशाल गणेश मुक्तता करेल व समस्त मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले होती. यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करुन लवकरात लवकर या कोरोनापासून मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना करावी, असे आवाहन केले. माळीवाडा येथील श्री संत सावता महाराज विठ्ठल-रुख्मीणी मंदिर येथे शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, सावता महाराज उत्सव समितीचे प्रमुख छबूनाना जाधव, कैलास खरपुडे, सतीश डागवाले, बाळासाहेब पुुंड, अशोक कापरे, चंद्रकांत ताठे, अनिल चेडे, दत्ता जाधव, जालिंदर बोरुडे, बाळासाहेब आगरकर, गणेश राऊत आदिंसह भजनी मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली असल्याने आज विशेष पुजा करण्यात आली. यावेळी मोजकेच भाविक उपस्थित होते. याप्रसंगी संगमनाथ महाराजांनी लवकरच कोरोतून श्री विशाल गणेश मुक्तता करेल व समस्त मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले होती. यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करुन लवकरात लवकर या कोरोनापासून मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना करावी, असे आवाहन केले.