रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी प्रा.संजय नागपुरे यांची वर्णी !!


रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी प्रा.संजय नागपुरे यांची वर्णी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

पोहेगाव -नुकत्याच सातारा येथे मा.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत उत्तर विभागीय कार्यालय अहमदनगर येथे कार्यरत असलेले विभागीय अधिकारी मा.श्री संजय नागपुरे यांची माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी एक मताने निवड झालेली आहे श्री संजय नागपुरे यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय कोळपेवाडी तालुका कोपरगाव या ठिकाणी नोकरीची सुरुवात केली पुढे त्यांची श्रीगोंदा या ठिकाणी त्यांनी उत्कृष्टपणे आपली कारकीर्द दहा वर्षे पूर्ण केली त्यानंतर शिवशंकर विद्यालय रवंदे तालुका कोपरगाव या ठिकाणी चार वर्ष उत्कृष्ट सेवा करून सन 2011 मध्येश्री छत्रपती शिवाजी विद्यालय कोळपेवाडी तालुका कोपरगाव या ठिकाणी प्राचार्यपदी विराजमान झाले या शाखेमध्ये उत्कृष्ट काम कामकाजाची छाप पाडून या विद्यालयास कर्मवीर पारितोषिक मिळवून दिले याच काळामध्ये स्वर्गीय मा.शंकरराव काळे साहेब यांचे विश्वासू प्राचार्य म्हणून नाव लौकिक मिळविला याच काळामध्ये ते रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर व लाइफ मेंबर झाले त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल येसगाव ता.कोपरगाव याठिकाणी प्राचार्यपदी उत्कृष्ट काम करून त्याही विद्यालयास कर्मवीर पारितोषिक मिळवून दिले सन दोन हजार अठरा मध्ये त्यांच्या कामाची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेने त्यांची उत्तर विभागीय अधिकारी म्हणून अहमदनगर येथे निवड केली या काळामध्ये अंबिका विद्यालय केडगाव येथे प्राचार्य पदाची धुरा सांभाळत या विद्यालयास कर्मवीर पारितोषिक प्राप्त करून दिले रयत शिक्षण संस्थेमध्ये तीन शाखांना पारितोषिक प्राप्त करून देणारे एकमेव प्राचार्य श्री संजय नागपुरे साहेब असावेत असे वाटते विभागीय अधिकारी असताना दोन वर्षाच्या कालावधीत कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय असणाऱ्या नागपुरे यांनी एन एम एम एस स्कॉलरशिप रयत प्रज्ञाशोध परीक्षा एनटीएस परीक्षा नवोदय परीक्षा या माध्यमातून उत्तर विभागास संस्थेच्या अव्वलस्थानी मानाचा दर्जा प्राप्त करून दिला त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने मा.शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिकार्‍यांच्या निवडीत दिनांक 27 जून 2020 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी त्यांची निवड केली ही अभिमानाची बाब आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉक्टर अनिल पाटील साहेब मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मा. मीनाताई जगधने मा.व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे साहेब सचिव मा.भाऊसाहेब कराळे साहेब विभागीय अध्यक्ष माननीय दादाभाऊ कळमकर साहेब साहेब मा.शंकररावजी कोल्हे साहेब मा.आमदार आशुतोष दादा काळे साहेब मा.अरुण कडू पाटील मा.बाबासाहेब भोस मा.राजेंद्र फाळके पाटील त्याचबरोबर सर्व रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य मुख्याध्यापक व सर्व रयतसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले

 या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News