दौंड शहरात रुग्णांची वाढ होत असल्याने उपविभागीय अधिकारी यांचा आदेश येईपर्यंत दौंड शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून राहील -- मुख्याधिकारी मंगेश शिंदे


दौंड शहरात रुग्णांची वाढ होत असल्याने उपविभागीय अधिकारी यांचा आदेश येईपर्यंत दौंड शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून राहील -- मुख्याधिकारी  मंगेश शिंदे

पुणे विठ्ठल होले( प्रतिनिधी): दौंड शहरात रोजच रुग्णांची वाढ होत असल्यामुळे माननीय उपविभागीय अधिकारी यांचे पुढील आदेश येईपर्यंत दौंड शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून राहील अशी माहिती दौंड नगरपालिका मुख्याधिकरी मंगेश शिंदे यांनी दिली. दौंड शहरात मागील आठवड्यात सर्वच स्वाब निगेटिव्ह आले होते त्यामुळे दौंड शहरातील रुग्णांची संख्या कमी होईल असे वाटत असताना गेल्या दोन दिवसात अनुक्रमे आठ आणि तेरा अशी मोठी आकडेवारी आल्याने दौंडकर नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे,त्यामुळे सध्या दौंड प्रतिबंधित क्षेत्र जाहीर आहे,त्यामध्ये प्रामुख्याने दवाखाने,मेडिकल सोडून अत्यावश्यक सेवा सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू आहेत आणि घरपोच दूध विक्री सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहील या व्यतिरिक्त अन्य कोणतेही दुकान सुरू ठेवू नये सुरू असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा आदेश आहे,तोच आदेश पुढे माननीय उपविभागीय अधिकारी यांचा पुढील आदेश येईपर्यंत दौंड शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून राहील,तरी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन मंगेश शिंदे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News