महिला पोलिसाचा विनयभंग करुन गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासली


महिला पोलिसाचा विनयभंग करुन गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासली

आरोपी देवळाली प्रवरातील माजी सैनिक

देवळाली प्रवरा विजय भोसले / प्रतिनिधी 

                देवळाली प्रवरा येथील एका पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेवून पोलिस भरती झालेल्या महिला पोलिसाची प्रशिक्षण संस्थेच्या संचालकाने नाशिक येथे घरी जावून विनयभंग केला असुन नाशिक उपनगर पोलिस ठाण्यात प्रशिक्षण संस्थेचा संचालक राजेंद भाऊसाहेब कडू (वय 56)  याच्या विरोधात महिला पोलिसाच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रशिक्षण संस्थेच्या संचालकाने गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासली आहे.

              याबाबत नाशिक उपनगर  पोलिस ठाणे अंमलदार  व  तपासी अंमलदार साहय्यक पोलिस उप निरीक्षक बाळासाहेब सोनवणे यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार  देवळाली प्रवरा येथील नगर मनमाड लगत असलेल्या पोलिस भरती पुर्व  प्रशिक्षण संस्थेचा संचालक  राजेंद्र भाऊसाहेब कडू याने आपल्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेवून भरती झालेल्या महिला पोलिसाचे घर पाहण्याच्या बहाण्याने जावून  चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेलेल्या महिलेच्या पाठीमागुन जावून मीठी मारुन अंगलट करुन  लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी त्या महिला पोलिसाने मोठ्याने आरडाओरड केली.त्याच वेळी राजेंद्र कडु यांनी धुम ठोकली. 

                 महिला पोलिसाच्या फिर्यादीत असे नमुद करण्यात करण्यात आले आहे  की, भरती पुर्व प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण कालावधीतही  या संचालकाने अंगलट करण्याचा प्रयत्न केला होता.दि.14 जुलै रोजी दुपारी 3;30 वाजता प्रशिक्षण संस्थेचा संचालक राजेंद्र  भाऊसाहेब कडू हा घरी येण्या पुर्वी  महिला पोलिसाच्या  पतीला भ्रमणभाषवर संपर्क साधुन  विद्यार्थीनीचे घर पाहण्यासाठी आलो आहे.  त्या महिला पोलिसाच्या पतीने मी घरी नाही सैन्यदलात आहे. परंतू मी तीला भ्रमणभाषकरुन सांगतो तुझे गुरु आले आहेत त्यांना घरी घेवून जावून चहा पाणी कर असा पतीचा निरोप  मिळाल्याने गुरुच्या नात्याने महिला पोलिसाने राजेंद्र कडू याला घरी नेले. चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता पाठीमागुन जावून मीठी  मारुन अंगलट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पोलिस मोठमोठ्याने आरडाओरड  केली असता त्याने घाबरुन जावून तो पळूण गेला. 

              महिला पोलिसाने उपनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात गु.रं. नं. 366/2020  नुसार 354 ,323 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास साहय्यक पोलिस उप निरीक्षक  बाळासाहेब  सोनवणे हे करीत आहेत

सोशल मिडीयावर देवळालीच्या असाराम  बापूची चर्चा....देवळाली प्रवरात शनिवारी सकाळी सोशल मिडीयावर  त्या भरती पुर्व  प्रशिक्षण संस्थेच्या  संचालकाचा फोटो व त्या खाली देवळालीचा असाराम बापू पकडला  व्हायरल करण्यात आला होता.या असाराम बापूला  जनतेने धडा शिकविला पाहिजे. यापुर्वी या संचालकाने आपल्या भगिनीशी अंगलट केली असेल तर फिर्याद दाखल करा. त्या विद्यार्थीनीला  पुर्ण संरक्षण देण्यात येईल. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोखु देवू नका असे आवाहन सोशल मिडीयावरुन करण्यात येत होते.

यापुर्वीचे प्रकरण पैसा आणि दडपशाहीने मिटविले

यापुर्वी पोलिस भरती पुर्व  प्रशिक्षण संस्थेच्या संचालकाने प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिंनींशी अंगलट केली असल्याची चर्चा पुढे येत आहे. परंतू पैशाच्या जोरावर व  दडपशाहीने व विद्यार्थींनीच्या  मुळ गुणपञिका व कागदपञे ताब्यात ठेवल्याने  विद्यार्थींनीनी कुठेही तक्रार केली नाही.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News