एस.बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल


एस.बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

विठ्ठल होले पुणे

  पिंपरी (दि. 18 जुलै 2020) पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस.बी. पाटील काँलेज आँफ सायन्स आणि काँमर्स या कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी (एचएससी बोर्ड) शास्त्र शाखेचा शंभर टक्के तर वाणिज्य शाखेचा 98 टक्के निकाल लागला. शास्त्र शाखेत खुशी पारखे 83.38 टक्के प्रथम, सौरभ वाघमोडे 83.07 टक्के व्दितीय, श्रद्धा पाटील 81.69 टक्के तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत अथर्व काळे 91.23 टक्के प्रथम, आदित्य जाधव 89.69 टक्के व्दितीय, वैष्णवी आगरवाल 88.62 टक्के तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. सौरभ वाघमोडे याने गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविले. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डाँ. गिरीश देसाई, प्राचार्य संदिप पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News