लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले, तरी त्यांचे साहित्य क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे -जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड शिवाजीराव काकडे


 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले, तरी त्यांचे साहित्य क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे -जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड शिवाजीराव काकडे

अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांसाठी आपल्या साहित्यामधून खूप मोठे योगदान काम केले. ते महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले, तरी त्यांचे साहित्य क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव येथे केले. 

शेवगाव (प्रतिनिधी) सज्जाद पठाण लोकशाहीर, साहित्यरत्न, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज जनशक्तीकडून कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, सुरेशनाना चौधरी, भाऊसाहेब सातपुते, सोपानराव पुरनाळे, शांतीलाल गांगे इ. प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ॲड. काकडे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा व कादंबरी हे साहित्य प्रकारही त्यांनी तेवढ्याच ताकदीने हाताळले. त्यांनी साहित्यातील लोक वाड:मय, कथा, लोकनाट्य, कादंबरी, चित्रपट, पोवाडे, गौळण, प्रवासवर्णन असे सर्वच प्रकार व समृद्ध केले. त्यांनी लालबावटा हे पथक स्थापन केले. कै. अण्णाभाऊ साठे हे  कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे विधानसभा निवडणुकीसाठी शेवगाव येथे प्रचारासाठी आले होते. त्यांचे व काकडे कुटुंबांचे स्नेहाचे मैत्रीचे संबंध होते. त्यांनी गोरगरीब वंचित लोकांसाठी खूप मोठे योगदान दिले. अण्णाभाऊंचे विचार आजही युवकांसाठी प्रेरणादायी ठरावयाचे असतील तर त्यांचे पाठ १० वी  व १२ वीच्या अभ्यासक्रमांमध्ये शासनाने समाविष्ट केले पाहिजे. महाराष्ट्राचे इतिहासावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. मराठी भाषेचा त्यांना सार्थ अभिमान होता. मराठी संस्कृतीवर त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला होता. कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणजे कै.अण्णाभाऊ होते असेही ॲड काकडे म्हणाले.

सौ. हर्षदा काकडे म्हणाल्या की, देशातील धनदांडग्यांनी, जातदांडग्यांनी, व धर्मदांडग्यांनी त्यांचे शोषण केले. त्या लोकांच्या बाजूने कै. अण्णाभाऊ साठे उभे राहिले. कामगार वर्गाविषयीची व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अण्णाभाऊ स्वतः कामगार होते. त्यामुळे गोरगरीब दलित वंचितांचा आधार म्हणून त्यांनी काम केले असेही सौ. काकडे म्हणाल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News