अमुलने दिला इंदापुरातील दूधगंगा दुधउत्पादक संघाच्या उत्पादकास प्रतिलिटर 75 रुपय दर


अमुलने दिला  इंदापुरातील दूधगंगा दुधउत्पादक संघाच्या उत्पादकास प्रतिलिटर 75 रुपय दर

इंदापूर (प्रतिनिधी) काकासाहेब मांढरे

राज्यात गाईच्या दुधाचा दर हा पंचवीस रुपये प्रति लिटर असला पाहिजे यासाठी अनेकदा आंदोलने झाली, सरकारने यापूर्वी अनेकदा अनुदान दिले, त्याच्या शिफ्ट काढून दिल्या, परंतु आजही दुधाचा दर फॅट आणि एसएनएफ नुसार 18 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंतच मिळतो. अशावेळी काही दिवसांपूर्वी अमुलने म्हशीच्या दुधाला 62 रुपये प्रति लिटर दर दिला होता, आज चक्क हाच दर एका लिटर ला 75 रुपये मिळाला आहे.

इंदापुरातील दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाकडून जे दूध संकलन केले जाते, त्यापैकी दररोज 10 ते 12 हजार लिटर दूध अमुल खरेदी करते. यासंदर्भात दूधगंगा संघाने अमुल शी दूध खरेदीचा पाच वर्षाचा करार केलेला आहे. गुजरात मधील सहकारी असलेल्या परंतु जगभरात असलेल्या अमुलने इंदापुरातील दूध स्वीकारल्याने भविष्यात दुधाच्या दराची स्पर्धा महाराष्ट्रात सुरू होईल, त्याचे सुरुवातीचे काही नमुने सध्या पाहायला मिळत आहेत. 

 योगायोगाने दूधगंगा संघाचे संस्थापक हर्षवर्धन पाटील हे सध्या भाजपमध्ये असून गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा गड असलेल्या गुजरात मधून जगभरात प्रसिद्ध झालेल्या अमूलने इंदापुर मध्ये दूध उत्पादकांना मदतीचा हात द्यावा हा देखील एक वेगळा योग सध्या पाहायला मिळत आहे.  इंदापूर तालुक्यातील राजवडी सोसायटीच्या दूध संकलनात अमोल गायकवाड यांनी त्यांच्या म्हशीचे दूध पुरवले. हे दूध साडेआठ एसएनएफ पेक्षाही पुढे जाऊन चक्क साडेअकरा फॅट चे भरल्याने ह्या फॅटच्या सूत्रानुसार  असलेल्या दुधाच्या दर सूत्रांमध्ये अमोल गायकवाड यांना त्यांच्या २.२० लिटर दुधा करता प्रतिलिटर ७५.८० अशी रुपये दरानुसार १६६ रुपये मिळाले. हा आकडा छोटा असला व दूध उत्पादक एकच असला, तरी देखील उच्च प्रतीच्या दुधाची अमूल करीत असलेली प्रतवारी व देत असलेला दर निश्चितच दूध उत्पादकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. यासंदर्भात दूधगंगा संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले, दूधगंगा संघ सध्या तीस ते पस्तीस हजार लिटर प्रतिदिनी दूध संकलन करीत आहे, त्यापैकी १० ते १२ हजार लिटर दूध अमुल ला पुरवले जात आहे. यापुढील काळात यामध्ये निश्चित वाढ होईल व दूध उत्पादकांचा ही विश्वास नक्की वाढेल.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News