श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी घरातच साजरी करावी !! -जिल्हा ऊत्तर अध्यक्ष मुकुंद मामा काळे


श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी घरातच साजरी करावी !! -जिल्हा ऊत्तर अध्यक्ष मुकुंद मामा काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव -कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे रुग्ण संख्या वाढत आहे.व ही साखळी खंडित व्हावी तसेच लॉकडाऊन मध्ये करण्यात आलेली स्थितीलता त्यामुळे या महिन्यात येत असलेला संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा घरात राहूनच साजरा करावा असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघांचे जिल्हा ऊत्तर अध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी केले आहे.

      रविवार १९ जुलै रोजी संत शिरोमणी सावता महाराज यांचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा पुण्यतिथी असून दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अखंड हरिनाम सप्ताह,किर्तने,प्रवचने,अन्नदान महाआरती यांचे भव्य आयोजन करुन साजरा करण्यात येत असतो.

        परंतु यावर्षी संपूर्ण जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला असल्यामुळे शासन व प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत.त्याच पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांत लाॅकडाऊन स्थितील जाहिर केल्यामुळे सर्व समाजबांधवांनी भाविकांनी संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी घरातच प्रतिमापूजन,दिपप्रज्वलन करुन विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करावी.तसेच कोरोना सारख्या महामारीच्या संकटात स्वतःची तसेच कुटुंब व आपल्या मित्रपरिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन अहमदनगर जिल्हा ऊत्तर अध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News