युरियाची टंचाई दूर व्हावी आ.आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी


युरियाची टंचाई दूर व्हावी आ.आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा करतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

                         कोळपेवाडी वार्ताहर - कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई जाणवत असून हि टंचाई दूर व्हावी अशी मागणी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केली असून पालकमंत्र्यांनी या मागणीची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून निर्माण युरिया टंचाई दूर करावी आदेश दिले आहे.

                    शनिवार (दि.१८) रोजी कोपरगाव तहसील कार्यालय येथे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची सदस्य स्थिती रुग्णांवर सुरु असलेले उपचार याची सखोल माहिती दिली.त्याचबरोबर मतदार संघातील अनेक समस्यांकडे  देखील पालकमंत्र्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी लक्ष वेधले.यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या युरिया खत टंचाई तातडीने दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घातले.यावर्षी पर्जन्यमान चांगले होत असून शेतकऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतात पेरण्या केल्या आहेत. सर्व पिके जोमात आहेत. मात्र 

चौकट-  मतदार संघात युरिया खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून पिकांना वेळेवर युरिया मिळाली नाही तर उत्पन्नात घट होवून शेतकऱ्यांचे नुकसान होवू शकते.त्यासाठी लवकरात लवकर युरिया खताचा साठा उपलब्ध व्हावा अशी मागणी केली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना याबाबत आदेश कोपरगाव मतदार संघात निर्माण झालेली युरिया टंचाई दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश दिले त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News