रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरविभाग अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे!! टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार


रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरविभाग अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे!! टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार

संजय भारती कोपर प्रतिनिधी

कोळपेवाडी वार्ताहर - रयत शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलची सभा नुकतीच सातारा येथे संस्थेचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पार पडली.या सभेत रयत शिक्षण संस्थेच्या विविध विभागीय अध्यक्षांची निवड करण्यात आली असून उत्तर विभागीय अध्यक्षपदी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

             रयत शिक्षण संस्थेशी बांधिलकी ठेवून संस्थेच्या चेअरमनपदाची सलग पंधरा वर्ष जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळून रयत शिक्षण संस्थेचा विस्तार वाढविण्यात माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी मोलाचे योगदान दिले आहे. साहेबांनंतर माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील रयत शिक्षण संस्थेसाठी सर्वोतोपरी मदत केलेली आहे. काळे परिवाराचा हा वारसा आमदार आशुतोष काळे यांनी पुढे चालवून रयत शिक्षण संस्थेची प्रगती करावी या उद्देशातून संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी हि जबाबदारी आमदार आशुतोष काळे यांच्या खांद्यावर टाकली आहे. आमदार आशुतोष काळे उच्च शिक्षित असून मागील पाच वर्षात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना आदर्श कारभार करून कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे. निर्णय घेण्याची अफाट क्षमता असलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी मागील वर्षी पार पडलेल्या चुरशीच्या विधानसभा निवडणुकीत मिळविलेला विजय शरदचंद्र पवार यांना विशेष भावला होता.आमदार आशुतोष काळे यांच्यासाठी कोपरगावमध्ये शरदचंद्र पवार यांनी जाहीर सभा देखील घेतली व या सभेत भविष्यातील महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख राजकारणी व्यक्तींमध्ये आशुतोष काळे यांना पाहत असल्याचे त्यांनी सांगितले होते. सभेतील आपले ते वक्तव्य सत्यात उतरवून आमदार आशुतोष काळे यांच्यावर शरदचंद्र पवार यांनी उत्तर विभाग अध्यक्षपदी निवड करून अभ्यासू व्यक्तिमत्वाला संधी दिली आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या उच्च शिक्षणाचा उपयोग हा रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी व्हावा या उद्देशातून रत्नपारखी शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना हि संधी दिली असून या संधीचे आमदार आशुतोष काळे हे नक्कीच सोन करतील. यावेळी पार पडलेल्या सभेत इतरही चार विभाग अध्यक्षांची निवड करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे पश्चिम विभाग–ॲड. राम कांडगे, रायगड विभाग-आमदार बाळाराम पाटील, मध्य विभाग – संजीव पाटील, दक्षिण विभाग – माधवराव मोहिते यांचा समावेश आहे. या बैठकीसाठी संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील,सचिव, सेक्रेटरी व सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य उपस्थित होते.

           कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आदर्श विचारांवर कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी केलेल्या कार्याची दखल घेवून काळे परिवाराचा वारसा पुढे चालविण्याची आदरणीय खा.शरदचंद्र पवार यांनी जबाबदारी दिली त्याबद्दल रयत परिवाराचा अत्यंत आभारी आहे.माझ्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार – आमदार आशुतोष काळे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News