सडक या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेत आणि गजानान सोसायटी परिसरात होमियोपॅथिक औषधांचे वाटप, अरुणा डहाळे व डॉ थोरात यांचा स्तुत्य उपक्रम


सडक या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेत आणि गजानान सोसायटी परिसरात होमियोपॅथिक औषधांचे वाटप, अरुणा डहाळे व डॉ थोरात यांचा स्तुत्य उपक्रम

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी:: दौंड शहरासह परिसरात कोरोनचां प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे त्याला रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे विनाकारण बाहेर न फिरता घरात थांबणे, परंतु लोक गांभीर्याने दखल घेत नाहीत, त्यातही काही लोक निस्वार्थ पणे सेवा करण्यात धन्यता मानतात,त्यामध्ये दौंड नगर पालिका नगरसेविका अरुणा डहाळे आणि डॉ रणजित थोरात हे लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना काळजी घेण्यास सांगून औषध वाटप करीत आहेत,त्यांनी अर्सेलिक अल्बम या होमियोपॅथी औषधाचे वाटप प्रभागाच्या नगरसेविका ॲड.अरुणा डहाळे व डॉ.रणजित थोरात यांच्या वतीने  करण्यात आले.पानसरे वस्ती येथील सडक या संस्थेत आणि गजानन सोसायटी परिसरात एकूण ५००बॉटल वाटण्यात आल्या त्याचा लाभ २०००लोकांना घेता येईल.आता पर्यंत १५०० बॉटल चे वाटप करण्यात आले असून त्याचा लाभ ५००० लोकांना घेता आला असल्याची माहिती अॅड.डहाळे व डॉ.थोरात यांनी दिली.अजूनही वाटप करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News