पुरंदर विमानतळाचे काम तेथील ग्रामस्थांना विचारात घेऊन सुरू करणार - मा. कृषीमंत्री शरद पवार


पुरंदर विमानतळाचे काम तेथील ग्रामस्थांना विचारात घेऊन सुरू करणार - मा. कृषीमंत्री शरद पवार

सुपे हे पुरंदर विमानतळानंतरचे सर्वांत मुख्य ठिकाण शेतकऱ्यांनी जमीन विकू नये - मा. कृषीमंत्री शरद पवार

सुपे प्रतिनिधी / सचिन पवार 

                बारामती तालुक्यातील सुपे व परिसराचा लवकरच कायापालट होईल पुरंदर विमानतळाच्या पार्श्वभुमीवर सुपे हे सर्वात मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत, असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. तसेच पुरधंर विमानतळा संर्दभात तेथील बाधित ग्रामस्थांशी चर्चा करून लवकरच विमानतळाचे काम सुरू करू असा इशारा पवार यांनी दिला. यावेळी येथील विद्या प्रतिष्ठानच्या नियोजित शैक्षणिक संकुलाची जागा व बांधकामाची पाहणी, अद्यवत सुरू असणाऱ्या ग्रामीण रूग्णालयाची पाहणी नियोजीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागे संदर्भात माहिती शरद पवार यांनी घेतली, तसेच जागेची पाहणी करून इमारत केंव्हा तयार होईल. ग्रामिण भागातील किती विद्यार्थ्यांची सोय होईल, शैक्षणिक सुविधा काय असतील, अशी बारकाईने माहिती पवार यांनी या वेळी घेतली.तसेच अष्टविनायक मार्गची व  जनाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी नियमीत मिळते का. पाऊस झाला का. या वेळी कोणती पिके घेतली आहेत. ऊस किती लावला आहे. माझ्या वेळेचे कार्यकर्ते आता कोण कोण आहेत. त्यांची तब्येत कशी आहे. अनेक आजी- माजी व जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नावे घेऊन त्यांनी विचारपूस केल्याची माहिती उद्योजक शंकराव चांदगुडे ,भरत खैरे ,संजय दरेकर , शौकत कोतवाल यांनी दिली.

या संकुलासाठी सुमारे दहा एकर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल उद्योजक शंकरराव चांदगुडे यांचे पवार यांनी कौतुक केले.तसेच रस्त्यासाठी एकुन अजुन तीन एकर जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले, शिक्षणापासून वंचित राहणार असलेल्या मुलां- मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय येथे होणार आहे. सुप्यात चालू असलेले वरिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी माध्यमाची शाळा आगामी शैक्षणिक वर्षात या अद्ययावत शैक्षणिक संकुलात सुरू होईल, अशी चर्चा या वेळी झाल्याची माहिती चांदगुडे यांनी दिली.

 याप्रसंगी त्यांच्या समवेत विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. ए. व्ही. प्रभुणे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे , माजी सभापती नंदा खैरे, मा. सभापती शौकत कोतवाल, संजय दरेकर ,संपतराव जगताप, नितीन जगताप, अनिल हिरवे, दत्तात्रेय कदम, अतुल खैरे ,दत्तात्रेय पन्हाळे, हनुमंत चांदगुडे, सचिन चांदगुडे,आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News