बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)
चोपडज (ता.बारामती) या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ, सस्तेवाडी अंतर्गत आरोग्य उपकेंद्र चोपडज यांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयात एनसीडी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 30 वर्षावरील व्यक्तींची रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब तपासणी, ह्रदयाची गती, वजन-उंची इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. यात एकूण 28 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णांना गोळ्या औषधे मोफत देण्यात आली. हा कार्यक्रम सोशल डिस्टन्स व इतर नियम पाळून घेण्यात आला.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली सामसे, आशा शबाना शेख, ज्योती ठोंबरे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.