दौंड शहरात कोरोनाचा उच्चांक तब्बल 78 पैकी तेरा जण कोरोना बाधित,तर ग्रामीण भागातही पाच रुग्ण आढळले


दौंड शहरात कोरोनाचा उच्चांक तब्बल 78 पैकी तेरा जण कोरोना बाधित,तर ग्रामीण भागातही पाच रुग्ण आढळले

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी::दौंड शहरात मुख्य बाजारपेठेत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे ही चिंतेची बाब आहे जनतेनेच यावर विचार करून घरात बसावे,आम्ही आमचे प्रयत्न चोवीस तास तुमच्या सेवेत कायम करीत राहणार पण जनतेचे सहकार्य करणे महत्वाचे आहे असे डॉ संग्राम डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.आज कोरोनाने आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे,एकूण 78 लोकांचे घस्यातील द्रव तपासणी साठी पाठवले होते त्यापैकी तेरा लोकांचा अहवाल पोझीटीव असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे,त्यामध्ये प्रामुख्याने सात महिला आणि सहा पुरुष आहेत,इतके दिवस दौंड शहराच्या आजूबाजूला रुग्ण आढळले होते परंतू आता शहराच्या मुख्य बाजारपेठेत कोरोनाने प्रवेश केला असल्यामुळे ही चिंतेची बाब आहे,कारण दौंड शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर असताना दौंड शहरातील वाहतूक,वर्दळ काही केल्या कमी होत नाही,दुकाने लपून छपून सुरूच आहेत,त्यामुळे लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत,रोजच खरेदी साठी लोक बाहेर पडत आहेत,त्यामुळे कोरोना दौंडची पाठ सोडायला तयार नाही ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढतच आहे, नगर पालिका आणि पोलीस स्टेशन यांनी संयुक्त रित्या चार दिवसापासून कारवाईचा बडगा उगारला आहे,तरीही लोक गांभीर्याने विचार करत नाहीत,त्यामुळेच कोरोनाने आजपर्यंतचा उच्चांक मोडला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News