दौंड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी येरवडा जेल मधुन पळालेला आरोपी सिनेस्टाईल पाठलाग करून 36 तासात पकडला,दौंड पोलिसांचे सर्वत्र कौतुक


दौंड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी येरवडा जेल मधुन पळालेला आरोपी सिनेस्टाईल पाठलाग करून 36 तासात पकडला,दौंड पोलिसांचे सर्वत्र कौतुक

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी::पुणे येरवडा तुरुंगात तून 16 जुलै रोजी पहाटे पाच आरोपी पळून गेले होते त्यापैकी तीन आरोपी दौंड पोलीस स्टेशन येथे मोका अंतर्गत अटक होते,देवगण आजिनाथ चव्हाण वय 25 रा बोरावके नगर दौंड, गणेश अजिनाथ चव्हाण वय 22 ,आक्षा उर्फ अक्षय कोंडक्या चव्हाण वय 22 राहणार माळवाडी लिंगाळी दौंड  हे तीन आरोपी  खून दरोडा या गुन्ह्यात दौंड पोलीस स्टेशन येथे अटक होते त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना मोका अंतर्गत येरवडा जेल पुणे येथे पाठविण्यात आले होते,हे आरोपी आज ना उद्या त्यांच्या घरी नक्की येतील हे ओळखून पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी त्यांच्या घरावर पोलिसा मार्फत पाळत ठेवली होती, त्यापैकी गणेश अजिनाथ चव्हाण वय 22 हा दौंड बोरावके नगर येथे आल्याचे पोलीसांना समजले त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या  शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक,सहायक फौजदार दिलीप भाकरे,पो हवा कल्याण शिंगाडे,पो हवा असिफ शेख,पो हवा पांडुरंग थोरात,पो ना अण्णासाहेब देशमुख,पो ना सचिन बोराडे,पो कॉन्स्टेबल अमोल देवकाते, राहूल वाघ,अमोल गवळी,अमजद शेख,अक्षय घोडके,किरण राऊत,शैलेश हंडाळ,अप्पासाहेब करे,होमगार्ड सौरभ कापरे,गजानन थोरात,पोलीस मित्र सूरज फाळके यांनी रचून तो दिसण्याची वाट पहात होते,त्याला पोलिसांची कुणकुण लागताच तो पळून जाऊ लागला ही सर्व टीम त्याच्या मागे धावून सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आणि त्याला लगेच येरवडा जेल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी सांगितले.अवघ्या 36 तासात फरार झालेल्या आरोपीला दौंड पोलिसांनी पकडून त्याची पुन्हा येरवडा तुरुंगात रवानगी केली,त्यामुळे दौंड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.इतर दोन आरोपी लवकरच अटक करून तुरुंगात रवानगी केली जाईल असे  पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News