पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस.बी.पाटील पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल


पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस.बी.पाटील पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल

विठ्ठल होले पुणे

पिंपरी (17 जुलै 2020) :  पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावीचा (सीबीएसई) शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळेतील एकूण 78 विद्यार्थ्यांपैकी 33 विद्यार्थी 90 टक्‍क्‍यांच्या तर 80 टक्के ते 89 टक्क्यांमध्ये 21 विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

         तनया मिलिंद अजगर विद्यार्थिनीने शाळेत 98 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक आणि अनुष्का दाधीच हिने 97.5 टक्के तर रुद्र पाटील याने 97.1टक्के मार्क मिळवून अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविला. गणित विषयांमध्ये 8 विद्यार्थ्यांनी आणि माहिती तंत्रज्ञान विषयात 2 विद्यार्थ्यांनी 100/100 पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळविले. तसेच इंग्रजी- 4, हिंदी -2, सामाजिक शास्त्र-2, गणित-4, माहिती तंत्रज्ञान-7 या विषयांत 100 पैकी 99 गुण मिळविणारे विद्यार्थी आहेत. राजलक्ष्मी जमदाडे 96.8 टक्के, रजत हांडे 96.5 टक्के यांनी विशेष प्रावीण्य मिळविले.

         पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट (पीसीईटी) चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यपिका बिंदू सैनी व मुख्य पर्यवेक्षिका पद्मावती बंडा, उपपर्यवेक्षिका निरीपमा काळे, शुभांगी कुलकर्णी, अर्चना प्रभुणे, वंदना सांगळे व इतर सर्व शिक्षकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News