पार्टी ऑफ युनायटेड इंडियन्स च्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी- विकास कुलकर्णी.


पार्टी ऑफ युनायटेड इंडियन्स च्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी- विकास कुलकर्णी.

विशेष : प्रतिनिधी मिलिंद शेंडगे

पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्सची महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, केंद्र शासीत प्रदेश ,दमण-दीव, नगर हवेली, या राज्यात कामाला जोरदार सुरवात झाली असुन सर्व धर्म समभाव असणाऱ्या या पक्षात अनेक नामवंत सुशिक्षित डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, उद्योगपती ,शेतकरी, युवक ,महिला, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपआपल्या विभागात जोमाने काम करीत आहेत.

पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष: मा. अशोकजी बहादरे , राष्ट्रीय कोषाध्यक्ष: मा. ओमकार अय्यर, राष्ट्रीय महासचिव: मा. संभाजीराव जाधव व पदाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या बैठकीत सांगली जिल्हातील मिरज येथील सुप्रसिद्ध समाज सेवक मा. विकास विजय कुलकर्णी यांची पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्सच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी निवड करण्यात आली असुन नवं नियुक्त प्रदेश प्रवक्ते आपल्या पक्षाची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे जनते समोर मांडतील त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेछा।

जाहिरात
Search
विडिओ
Recent News