सलाम अहमदनगर पोलिसांना कोरोना संकट काळात कर्तव्यापलीकडे जाऊन जपत आहेत सामाजिक बांधिलकी!


सलाम अहमदनगर पोलिसांना  कोरोना संकट काळात कर्तव्यापलीकडे जाऊन जपत आहेत सामाजिक बांधिलकी!

अहमदनगर शहर पोलिस व गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठाण यांचा अनोखा संयुक्त उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत)

अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी कोराना या संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वत:च्या जिवाची काळजी न करता अहोरात्र काम करत आहेत.  

अहमदनगर जिल्हयात कोरोना (कोविड-19)  आजाराचा प्रादुर्भाव् वाढत आहे. या संकटात कर्तव्य बजावतानाही अहमदनगर जिल्हयातील एका पोलीस निरीक्षकास कोरोना संसर्गाची लागण झालेली आहे. अशी भयावह परिस्थीती असताना आपल्या कर्तव्यनिष्ठे मध्ये न डगमगता आपले कर्तव्य पार पाडत आहेत तसेच आपले कर्तव्य पार पाडत असतांना कर्तव्य पलीकडे जावुन समाजाप्रती असलेल्या कर्तव्य भावनेतुन लोकहित जपत आहेत. त्याचा प्रत्यय आज पुन्हा अहमदनगर शहर पोलिसांमुळे आला

    दत्तात्रेय चिपाडे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव तेजस चीपाडे यांच्या लगना निमित्त मोठया कार्यक्रमला फाटा देत गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान यास अकरा हज़ार रुपए चे धनादेश दिले, त्यात गुरु अर्जुन प्रतिष्ठान ने अजुन  रू.14000/- टाकून अश्या एकूण 24000/- 200 विद्यार्थी करिता शैक्षणिक साहित्य देन्यात आले. कोरांना संकटात शाळा कॉलेज बंद आहेत. विदयार्थांच्या शिक्षणा करीता महाराष्ट्र राज्य प्रशासन उच्च् स्तराच्या उपाययोजना करत आहेत. परंतु कोरांना संकटात दररोज कष्टाची, रोजंदारीची कामे करुन त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर आपली उपजिवीका भागविणारे लोकांवर  कुटुंबातील व्यक्तींच्या एक वेळेचे जेवणाचा प्रश्न निर्माण झाला त्यात ते कुटुंबातील शिक्षण घेत असलेले मुलांसाठी शालेय साहित्याचा खर्च कसा भागविणार अशी बिकट परिस्थती सर्व सामान्य लोकांवर आलेली होती. याची दखल अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने घेतली.श्री. अखिलेश कुमार सिंह, अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.सागर पाटील अप्पर पोलिस अधीक्षक अहमदनगर, श्री.संदिप मिटके  DYSP नगर शहर विभाग,अहमदनगर  यांच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे अहमदनगर जिल्हा पोलीस दल व अहमदनगर शहरातील गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठाण स्वयंसेवी संस्थेचे श्री.हरजीतसिंह वधवा, श्री.राजा नारंग, श्री.राहुल बजाज, श्री.भारत बागरीचा , श्री करण धुप्पर यांचे संयुक्त उपक्रमातुन रामवाडी झोपडपटटी येथील गरवंत कुटुंबीयांतील मुलांच्या शिक्षणासाठी  वही, पाटी, खडु, पेन्सील, स्केल, इरीझर ,पेन, कंपास, रंग पेटी, DRAWING BOOK इत्यादी शालेय साहित्याचे वाटप केले. स्वाती साळवे या विद्यार्थिनीने यातून  प्रेरणा घेऊन  पोलिस अधिकारी होण्याची भावना व्यक्त केली. बाल भवनच्या प्रतिनिधी शबाना शेख यांनी आभार मानले अहमदनगर शहर पोलीस व गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त उपक्रमाचे समाजातुन कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News