कोरोनाचा वाढता संसर्ग बघता तालुक्यातील दुकांनदारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी !! कोपरगांव तालुका बाजारपेठ पुनर्निर्माण समिती


कोरोनाचा वाढता संसर्ग बघता तालुक्यातील दुकांनदारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी !!  कोपरगांव तालुका बाजारपेठ पुनर्निर्माण समिती

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्याच्या लगत असलेल्या तालुक्यांमध्ये कोरोना वाढता संसर्ग बघता तालुक्यातील छोटे-मोठे व्यापारी तसेच त्या दुकानांतील मजुर,कामगारांनी आपला व्यवसाय करताना प्रशासनाने घालुन दिलेले नियम काटेकोरपणे पाळत योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन  कोपरगाव तालुका बाजारपेठ पुनर्निमान समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

कोरोना संकटाच्या या काळात  प्रशासनाने दिलेल्या ९ते ५या वेळेत फक्त आपला व्यवसाय न बघता थोडी खबरदारी घेणे गरजेचे असुन प्र शासनाने सांगीतलेले नियम पाळणे गरजेचे आहे तसे न झाल्यास तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढुन प्रशासनाने पुन्हा टाळेबंदी लागु केली तर पुन्हा एकदा आपले व्यवसाय काही दिवसासाठी बंद ठेवावे लागतील व पर्यायाने आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल तरी तालुक्यातील छोटया दुकानरांनी प्रशासनाने खाली दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन कोपरगाव तालुका बाजारपेठ पुनर्निमाण समितीच्या वतीने करन्यात आले आहे

■ छोट्या मोठ्या प्रत्येक दुकानदाराने आलेल्या प्रत्येक ग्राहकाला ३ ते ५ फुट अंतराने ऊभे ठेवावे.शिवाय दुकानात आलेल्या ग्राहकात ३ ते ५ फुट अंतर असल्या शिवाय कुठलाही व्यवहार करु नये.

■ प्रत्येक ग्राहकाला दुकानाच्या बाजुला सँनेटायझर उपलब्ध करुन देत सुरुवातीला हात धुण्यासाठी सांगावे.

■ आलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या तोडाला मास्क आहे का याची खात्री करावी.कित्येकदा दुकानदार किंवा ग्राहक एकमेकांचे बोलणे ऐकु जावे या नावाखाली मास्क किंवा रुमाल खाली गळ्यावर ओढतात. हे अत्यंत धोकेदायक आहे.

■ दुकानदाराने ग्राहकांना जास्तवेळ रेंगाळत ठेवू नये.रिकाम्या गप्पा मारत कोणाला बसू देवू नये.

■ शक्यतो ग्राहकांकडून मालाची यादी Whatsapp वर मागवावी.

■ प्रत्येक दुकानदाराने बाहेरचा तालुका,जिल्हा,राज्य येथून ट्रान्सपोर्ट व्दारेआलेला माल उतरवतांना विशेष काळजी घ्यावी.

■ एखादा ग्राहक अनोळखी अथवा बाहेरच्या तालुक्यातील असेल तर त्याबाबत आधार कार्ड(आधार कार्ड हात नलावता लांबूनच तपासणी करावे.) पहावे

■ आपल्याच तालुक्यातील एखादी व्यक्ती किंवा आजुबाजुच्या तालुक्यातील व्यक्ती तालुक्यात कुठलेही महत्त्वाचे कारण नसतांना जा-ये करत असेल तर त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला कळवावी.

आपण स्वतः व आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News