संजीवनी युवा प्रतिष्ठान व मुर्शतपुर ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे रक्तदान शिबिर संपन्न !!


संजीवनी युवा प्रतिष्ठान व मुर्शतपुर ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे रक्तदान शिबिर संपन्न !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संजीवनी युवा प्रतिष्ठान व मुर्शतपुर ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झाल्याची माहिती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब दवंगे यांनी दिली आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असुन या पाश्र्वभुमीवर संजीवनी युवा प्रतिष्ठान व मुर्शतपुर ग्रामस्थांच्या वतीने दि.१७ जुलै रोजी रक्तदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०वा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांचा हस्ते या शिबिराचे उद्घघाटन करण्यात आले.या शिबिरास मुर्शतपुर परीसरातुन उत्तम प्रतिसाद मिळाला असुन शिबिरात चाळीस रक्तदात्यांनी आपले रक्त दान केले.यावेळी विवेक भैय्या कोल्हे याच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा परीसरात वृक्षारोप न करण्यात आले.या शिबिरास संजीवनी ब्लड बैंकेच्यावतीने निता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

या शिबिरास सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे,माजी संचालक दगु पा चौधरी,पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर,मधुकर उगले, रामदास शिंदे,अन्वरभाई शेख,दिलीप शिंदे,माजी सरपंच प्रकाश दवंगे, साहेबराव शिंदे,रंगनाथ उगले  चेअरमन (वामनराव उगले वि.वि. कार्यकारी सह सोसायटी मुर्शतपुर )सिताराम तिपायले, ग्रा.प. सदस्य,जेष्ठ पत्रकार सुरेशदादा रासकर,सुधाकर शिंदे, गोरख घोटेकर,त्रिंबक दंवगे,मा. उप सरपंच,शिवाजी शिंदे ग्रा.प सदस्य, रमेश नागरे,जालिंदर शिंदे, दिपक चौधरी ( माजी उपसरपंच धारणगाव,) राजेंद्र चांडे चांदगव्हाण किशोर शिंदे ग्रा सदस्य चांदगव्हाण,अस्लम शेख, भिमाशेठ संवत्सरकर ( सरपंच शिंगणापुर )सुनिल रजपुत (ग्रामसेवक मुर्शतपुर)आदि ग्रामस्थ सोशल डिस्टिंगशन पालन करत उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News