दौंड पोलिसांनी लॉकडाऊन काळात खून, दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पकडून मोका लावलेल्या तिघांसह पाच आरोपी येरवडाजेल मधून फरार


दौंड पोलिसांनी लॉकडाऊन काळात खून, दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पकडून मोका लावलेल्या तिघांसह पाच आरोपी येरवडाजेल मधून फरार

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी:: लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रक अडवून लुटमार करून खून करणाऱ्या तीन आरोपींना दौंड पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांच्यावर मोका लावण्यात आला आहे,त्यांची रवानगी येरवडा जेल पुणे येथे केली होती,त्या तीन अरोपीसह इतर दोन आरोपी गज उचकटून फरार झाले आहेत, दिनांक १६/०७/२०२० पहाटे च्या सुमारास तात्पुरते कारागृह,येरवडा या ठिकाणी येथील पहिला मजला, इमारत क्रमांक  ४ येथून खोली क्रमांक ५ मधील खिड़कीचे गज उचकटून तोडून टाकून ख़ालीलप्रमाणे एकूण ५ आरोपी पळून गेले आहेत.*

१) देवगण_अजिनाथ_चव्हाण,

रा. बोरावके नगर, तालुका दौंड, जिल्हा पुणे.

दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं.१४९/२०२०

भा.द.वी.क. ३९५,३९६,३९७ (मोका अंतर्गत)

२) गणेश_अजिनाथ_चव्हाण,

रा. बोरावके नगर, तालुका दौंड, 

जिल्हा पुणे. दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं.१४९/२०२०

भा.द.वी.क. ३९५,३९६,३९७ (मोका अंर्तगत)

३) अक्षय_कोंडक्या_चव्हाण,

रा. लिंगाळी माळवाडी तालुका दौंड, जिल्हा पुणे.

दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं.१४९/२०२०

भा.द.वी.क. ३९५,३९६,३९७ (मोका अंतर्गत)

४) अंजिक्य_उत्तम_कांबळे,

रा.सहकारनगर, टीळेकरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. २१९/२०२०

भा.द.वी.क. ३४४(अ),३८६,५०६,३४.

५) सनी_टायरन_पिंटो, 

रा. काळेवाडी पेट्रोल पंप बाजूस, स्मशान भूमी समोर,पुणे.

वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं. ५२४/२०२०

भा.द.वी.क.३७९.

तरी सदर आरोपींचा आप-आपल्या पोलीस ठाण्याचे हद्दीत शोध घेऊन मिळून आल्यास त्यांना ताब्यात घेऊन येरवडा पोलीस ठाण्यास अवगत करावे. #बलभीम_ननवरे

#सहा_पोलीस_निरीक्षक

#येरवडा_पोलीस_ठाणे

     #पुणे_महाराष्ट्र

या आरोपींविषयी कोणाला काहीही माहिती मिळाल्यास दौंड पोलिस ठाणे येथे त्वरित कळविणे, माहिती देणारा चे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन  दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी जनतेला  केले आहे*.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News