पोलीस मित्र संघ दौंड तालुका अध्यक्ष पदी सदाशिव रणदिवे यांची निवड


पोलीस मित्र संघ दौंड तालुका अध्यक्ष पदी सदाशिव रणदिवे यांची निवड

विठ्ठल होले पुणे

 दौंड प्रतिनिधी::  सध्याच्या  युगात कायदा-सुव्यवस्था ही काळाची गरज आहे पोलीस प्रशासन वरील होणारे ताण-तणाव व पोलिसांना सतत मदत करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था पुढाकार घेत असतात व त्यांच्याबरोबर कार्य करून पोलिसांना सतत मदतीचा हात देत असतात त्यामध्ये पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य हा संघ संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या संघाचे पदाधिकारी सतत पोलिसांबरोबर काम करत असतात दौंड तालुक्यातील व शहरातील पोलिसांवरील ताण कमी होण्यासाठी श्री सदाशिव रणदिवे यांची दौंड तालुका अध्यक्षपदी पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुरेश वाळेकर यांनी दौंड तालुक्याची जबाबदारी दिली आहे 

श्री.सदाशिव रणदिवे हे सतत सामाजिक, शैक्षणिक, कला, आरोग्य,क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असतात त्यांची कामाची पद्धत व कार्य करण्याची पद्धत बघून श्री वाळेकर सर यांनी त्यांच्यावर दौंड तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे 2014 मध्ये ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना श्री सदाशिव रणदिवे सर यांनी केले आहे या संस्थेचे ध्येय वेगवेगळे शैक्षणिक कला क्रीडा आरोग्य या क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रकारचे उपक्रम घेऊन समाजसेवा करणे तसेच गोरगरिबांना संस्थेच्या माध्यमातून मदत करणे असे वेगवेगळे समाजकार्य त्यांच्या हातून व त्यांच्या द्वारे केले जात असे ते नेहमी सामाजिक कार्यात मग्न असतात त्यामुळे त्यांच्यावर दौंड तालुका अध्यक्ष पदाची धुरी त्यांच्या हातात दिले आहे यावेळी पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रा. सुरेश वाळेकर सर यांच्या हस्ते व महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे राज्य सरचिटणीस मुकेश तीगोटे साहेब प्रा.दिनेश पवार सर राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग सेलचे विजयकुमार तुपे,दैनिक केसरी पत्रकार अमोल भोसले, महाराष्ट्र माझा दौंड प्रतिनिधी सनी पानसरे,राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे दौंड शहराध्यक्ष दीपक परदासणी दत्ताभाऊ तिगोटे, गणेश गायकवाड,माऊली पांचाळ एकनाथ गरजे इत्यादी या सोहळ्यास उपस्थित होते हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग चे पालन करून घेण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांनी श्री सदाशिव रणदिवे सर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

जाहिरात
Search
विडिओ
Recent News