सुपे | श्री. शहाजी विद्यालयाचा निकाल ९९.६९ टक्के


सुपे | श्री. शहाजी विद्यालयाचा निकाल ९९.६९ टक्के

यावर्षीही मुलींनी मारली बाजी , तीन्ही शाखेत मुलीच प्रथम 

सुपे प्रतिनिधी / सचिन पवार 

          येथी  श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल आज ऑनलाईन पध्दतीने जाहीर  झाला असुन यंदा देखिल माध्यमिक विद्यालयाचा  कला , विज्ञान , वाणिज्य शाखेचा १०० टक्के तर व्यवसाय  शाखेच्या ९८.५५ टक्के निकाल लागला तर एकुन सर्व शाखेचा ९९.६९ टक्के लागला आहे ,

तसेच बारावीचा विद्यालयाचा निकाल   ऑनलाईन पद्धतीने  घोषित करण्यात आला. असुन श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  कला शाखेच्या ६८ विद्यार्थ्यांनी  तर विज्ञान  शाखेतील ९५ विद्यार्थ्यांनी, वाणिज्य शाखेतील ८९ विद्यार्थांनी , तसेच व्यवसाय शाखेचा ६९ विद्यार्थांनी परीक्षा दिली होती. सर्व कला, विज्ञान , वाणिज्य शाखेचा १००टक्के  तर फक्त व्यवसाय शाखेचा  ९८.५५  टक्के लागला. यामध्ये कला शाखेतील  कु . राजश्री सुनिल चौधरी विद्याथीने ८४ .१५टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, कु.पुजा संतोष कुतवळ ७८.३० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर कु.प्रतिक्षा कुडलिक जगताप हिने ७५.८४ टक्के मिळाल्याने तृतीय क्रमांक पटकविला . कला शाखेतील तिनही क्रमांक मुलींचे आले असल्याने यावर्षी देखिल पंरपरा राखत मुलींनीच बाजी मारली .

तसेच वाणिज्य शाखेतील कु अनुजा विजय काळखैरे विद्यार्थीने ८१.०८ टक्के मिळवुन प्रथम क्रमांक ,प्रिती जवाहरलाल चiदगुडे हिने ८० टक्के मिळवून द्वितीय व तनुजा पोपट गायकवाड ७९.3८  टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे .तसेच विज्ञान शाखेतील कु अंकिता धोंडीबा नवले हिने ८१.३८ टक्के , अवंतिका कालिदास चांदगुडे ७७.८५८ टक्के दुतीय क्रमांक , निकिता पांडूरंग कुतवळ ७५.२३ टक्के तृतीय क्रमांक मिळवला आहे , व्यवसाय शाखेतील कु.अर्पिता अण्णा चौधरी ७६. टक्के प्रथम क्रमांक , नवनाथ भगवान जगताप यांस ७४.९२ टक्के मिळवुन द्वितीय क्रमांक , रिद्धी संतोष तरटे हिंस ७४ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक मिळवला आहे , सर्व उतीर्ण विद्यार्थांचे  प्राचार्य एम .एम .भोईटे, पर्यवेक्षिका लोणकर एम .ए, उपप्राचार्य बी.व्ही.गुलदगड, तसेच सुपे गावचे सरपंच , ग्रामस्था मार्फत अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News