शिवा व्हॅली स्कूलचा CBSE चा 10 वीचा निकाल 100% विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे ही कौतुक


शिवा व्हॅली स्कूलचा CBSE चा 10 वीचा निकाल 100% विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे ही कौतुक

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी:: सी.बी.एस.ई. बोर्डाचा १० वीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये शिवा व्हॅली  सी. बी. एस. ई. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घव-घवीत यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा नुकताच निकाल लागला आहे. यामध्ये या ही वर्षी विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली आहे. विद्यालयातील विद्यार्थी यश हनुमंत अर्जुन या विद्यार्थ्याने 95% गुण संपादन करून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला असून समृध्दी नवनीत भागवत हिने 92% गुण संपादन करून व्दितीय तर समृध्दी अविनाश ढमढेरे आणि प्रथमेश कदम यांनी ९१% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे. यश राहूल शहा यांनी 90% गुण प्राप्त करून चतुर्थ  व ओमकार गाडेकर आणि अनिकेत बारवकर यांनी अनुक्रमे 89%व88% गुण मिळवून उत्कृष्ठ यश प्राप्त केले, विद्यालयातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी  परीक्षा दिली तर त्यामध्ये सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह  उत्तीर्ण झाले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यां ना विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ मंगलाताई सोळंकी व जि.प.सदस्या सौ. राणीताई शेळके,प्रिंसिपल किरण सिंग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News