राहुरी फॅक्टरी येथील एकाच कुटुंबातील तीन जन कोरोना पाॅझिटिव्ह


राहुरी फॅक्टरी येथील एकाच कुटुंबातील तीन जन कोरोना पाॅझिटिव्ह

देवळाली प्रवरा नगरपालिका प्रशासनाने परिसर १० दिवसांसाठी कॅन्टोन्मेट झोन म्हणून सिल

 राहुरी प्रतिनिधी-विजय एस भोसले

राहुरी फॅक्टरी / प्रतिनिधी- येथिल एका प्रख्यात कॉलनीतील पती- पत्नी व मुलगा असे  एकाच कुटुंबातील तिघा जणांना कोरोनाची बाधा झाली असून या परिसर प्रशासनाने कॅन्टोन्मेट झोन म्हणून जाहीर केला आहे. तांदुळवाडी येथिल पिता-पुत्रांना रविवारी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या राहुरी फॅक्टरी येथील वाहन चालक व त्याची पत्नी तसेच दोन मुले असे एकूण चौघांना कृषी विद्यापीठ येथे कोरंटाइन करण्यात येऊन घशातील स्त्राव घेण्यात येऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले असता आज दुपारी यातील तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे राहुरी फॅक्टरी परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान कोरोना बाधित ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत सदरचा भाग देवळाली प्रवरा नगरपालिका प्रशासनाने सील करून सदर परिसर १० दिवसांसाठी कॅन्टोन्मेट झोन म्हणून जाहीर केला असल्याची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आली. बाधित कुटुंबाच्या घराजवळ व संपुर्ण कॉलनीत  देवळाली प्रवरा नगरपालिकेच्यावतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News