कोरोनाच्या पार्श्‍वभूमी व साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी निमगाव वाघात स्वच्छता अभियान व औषधाची फवारणी


कोरोनाच्या पार्श्‍वभूमी व साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी  निमगाव वाघात स्वच्छता अभियान व औषधाची फवारणी

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम

वाळकी विजय भालसिंग(प्रतिनिधी)- कोरोना महामारीची पार्श्‍वभूमीवर व साथीचे आजारांना प्रतिबंध करण्यासाठी निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच गावाच्या सार्वजनिक ठिकाणी औषधांची फवारणी करण्यात आली.

डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जालिंदर आतकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सोमनाथ आतकर, नवनाथ गायकवाड, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, विकास निकम, रंगनाथ शिंदे, बाबासाहेब काळे आदि उपस्थित होते.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. तर पावसाळा सुरु झाल्याने स्वाईन फल्यु, डेंग्यु आदि साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. या आजारांवर मात करण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. वैयक्तिक स्वच्छतेने सार्वजनिक ठिकाणचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. निरोगी जीवनासाठी स्वच्छता महत्त्वाची असल्याची भावना पै.नाना डोंगरे यांनी व्यक्त केली. गावातील सार्वजनिक व्यायामशाळा, मस्जिद, ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिर, वेस आदि ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून, वाढलेले गवत व काटेरी झाडे झुडपे हटविण्यात आले. तसेच या परिसरात औषधाची फवारणी करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News