तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीसह प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवू- गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड


तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीसह प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवू- गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड

शेवगाव: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळातर्फे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात गटशिक्षणाधिकारी रामनाथ  कराड यांना  निवेदन देताना रामकृष्ण काटे, बाळकृष्ण कंठाळी, बबनराव ढाकणे व इतर

 शेवगाव (प्रतिनिधी) सज्जाद पठाण

तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीसह प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची ग्वाही गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांनी दिली.

प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी संचालक विनोद फलके व शिक्षकनेते बाळासाहेब डमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या शिष्टमंडळाने  गटशिक्षणाधिकारी कराड यांची गुरूवारी ( दि. १६ ) भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. या वेळी कराड यांनी प्रलंबित प्रश्नांबाबत आश्वस्त केले.

वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झालेल्या प्राथमिक शिक्षकांना माहे जुलैच्या वेतनात वेतन निश्चिती करून लाभ मिळावा, प्रलंबित रजा व वेतनास मंजुरी मिळावी, १९ प्राथमिक शिक्षकांची वैद्यकिय बिले पंचायत समिती स्तरावर प्रलंबित असून त्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी तसेच मुख्याध्यापक पदोन्नतीत शाळांचा प्राधान्यक्रम, रिक्त जागा यांत रिक्त पदे किती कालावधीपासून, पट आदी निकषांचा उपयोग करून योग्य ती कार्यवाही व्हावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.  प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण काटे, संघटनेचे नेते बाळकृष्ण कंठाळी, सदिच्छाचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव ढाकणे, उच्चाधिकार समितीचे बाबासाहेब कोरडे, संजीवसिंह परदेशी, अरूण पठाडे आदींनी निवेदन देत चर्चेत सहभाग घेतला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News