तीन वर्षांपूर्वीच्या कारवाई साठी गेलेल्या पोलिसांवरील खुनी हल्ल्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद


तीन वर्षांपूर्वीच्या कारवाई साठी गेलेल्या  पोलिसांवरील खुनी हल्ल्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

विठ्ठल होले पुणे

 पुणे प्रतिनिधी::  खेड पोलीस स्टेशन हद्दीत दारू भट्टी वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पुणे टीमने अटक केली आहे. 1/10/2017 रोजी खेड पो. स्टे. येथे *गु.र.नं. 400/2017 भा. द. वि. 397, 307, 353, 332, 333, शस्त्र अधिनियम कलम 4, (25) मुं. प्रो. का. क. 65(ब), म. पो. अधिनियम 135, वन्यजीव संरक्षण का क 2(13), 2(36), 9, 39, 40(2), 50 (2), 51, 57* नुसारचा खेड पो. स्टे. चे पोलीस पथक दारूच्या हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी व रुपये 3,00,000 किंमतीचे महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तस्करीसाठी आणला आहे अशी माहिती मिळाल्याने त्यावरही कारवाई करण्यासाठी गेले असता तेथील स्थानिकांनी पोलिसांवर खुनी हल्ला केला म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर खुनी हल्ल्यात एकुण सात पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. 

             सदर गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. सदर आरोपी नामे *1) रघुनाथ दामु वाघ* वय - ४५ वर्षे, (पाहिजे आरोपी यादी क्र. 2288) *2) संतोष रघुनाथ वाघ* (पाहिजे आरोपी यादी क्र. 2286) *3) सखाराम दामु वाघ* (पाहिजे आरोपी यादी क्र. 2290) सर्व रा. विठ्ठलवाडी, शिरगाव, ता. खेड, जि. पुणे हे गावी आल्याचे एल. सी. बी. पुणे ग्रामीण च्या टीम ला बातमीदाराकडून समजल्याने तात्काळ आज दि.16/07/2020 रोजी पहाटे त्यांच्या राहते घरी जाऊन आरोपींना ताब्यात घेताना  स्थानिकांचा होणारा विरोध गृहीत धरून व्यावसायिक कौशल्य वापरून तिन्ही आरोपी एल. सी. बी. टीम ने ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी खेड पो. स्टे. च्या हवाली केले आहेत. 

              सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रवींद्र मांजरे, पो हवा. शंकर जम, पो. हवा. सुनील जावळे, पो. हवा. शरद बांबळे, पो. ना. दीपक साबळे, चा. पो. शि.  अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News