थोडंसं मनातलं.... कोविड-19 बाबतीत नागरिकांना स्वतः ची काळजी स्वतःच घ्यावी लागेल ......


थोडंसं मनातलं....    कोविड-19 बाबतीत नागरिकांना स्वतः ची काळजी स्वतःच  घ्यावी लागेल ......

नमस्कार मित्रहो, 

अहमदनगर जिल्ह्यातील कोविड-19 ची दररोज कमी जास्त होत संख्या आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने कोविड-19 बरोबरच साथीच्या रोगराई चे अहवान नागरिकांचे समोर निर्माण झाले आहे. सध्या कोविड-19 ला आटोक्यात आणण्यासाठी शासकीय पातळीवर खुप चांगल्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामुळेच कोरोना आटोक्यात येत आहे व कोविड-19 ची बाधा असलेले रूग्ण ठणठणीत बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे. महापालिका प्रशासन कोविड-19 च्या कामावर लक्ष देत आहेत. आता सध्या पावसाचे दिवस आहेत, शहरातील अनेक रस्त्यांवरून जाताना रस्त्याची चाळण झालेली बघायला मिळतेय तर अनेक ठिकाणी गटारी व ड्रेनेज तुंबले असल्याने व गटारीतील घाण मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर आल्याने त्यावर डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू, हिवताप, सर्दी खोकला अशा स्वरूपाचे साथीचे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी महापालिका प्रशासन यांनी घेतली पाहिजे. शहरातील अनेक खाजगी रहिवासी सोसायटी मध्ये असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. सध्या प्रशासन कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे परंतु याच बरोबर महापालिका प्रशासन यांनी शहरातील जनतेच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. त्या साठी महापालिका प्रशासन यांनी प्रथम शहरातील सर्व तुंबलेले गटारी आणि ड्रेनेज साफ करून त्यातील गाळ बाहेर काढायला पाहिजे. तसेच कोविड-19 चा प्रसार होऊ नये म्हणून  शहरातील प्रत्येक वाॅर्डात पुन्हा एकदा सॅनिटायझर फवारणी करणे गरजेचे व आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन  पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन जरी त्यांचे पातळीवर उपाययोजना करत असले तरी एक जबाबदारी म्हणून नागरिकांनी सुद्धा स्वतःची काळजी स्वतःच घेणे आवश्यक आहे. सध्याची आजची निर्माण झालेली परिस्थिती पहाता नागरिकांनी सतर्क रहावे व खबरदारी घेणे आवश्यक आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. त्यासाठी शासकीय आदेश व सूचनांचे  काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. सध्या कोविड-19 च्या संदर्भात समाजमाध्यमावर अनेक वेगवेगळ्या आफवा पसरविल्या जात आहेत त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु जनतेने जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांचे शासकीय आदेश आल्याशिवाय कोणत्याही आफवाना बळी पडू नये हि विनंती. एक मात्र निश्चितच आहेकी आता जनतेला स्वतःची काळजी स्वतःच घेणे आवश्यक आहे. आपणच जर आपली जबाबदारी विसरलो तर आपल्या घरातील लोकांना सुद्धा अडचणी निर्माण होतील याची जाणीव आपण ठेवलीच पाहिजे. पावसाळ्याचे दिवसात पुर्ण पणे खबरदारी घेतली पाहिजे तसेच आपल्या परिसरात जर गटारी व ड्रेनेज तुंबले असतील तर निःसंकोचपणे त्याची माहिती नगरसेवक व महापालिका प्रशासन यांना दिली पाहिजे. आपल्या भागात जर आपणच स्वच्छता ठेवली नाहीतर साथीचे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच कोविड-19 चा प्रसार होऊ नये म्हणून सुध्दा आपण सतर्क रहाणे गरजेचे आहे. कामधंदा, रोजगार, नोकरी व व्यवसायाचे निमित्ताने घराचे बाहेर पडताना मास्क, सॅनिटायझर चा वापर केला पाहिजे आणि कायमच सोशल डिस्टन्स ठेवला पाहिजे. कोणत्याही नागरिकांना असे वाटत नाही की,आपण कोरोना बाधीत व्हावे, पंरतु  अनवधानाने का होईना कोणीतरी बाधीत व्यक्ती संपर्कात येते आणि त्यामुळे कोरोना ची लागण होते. शासनाने साठ वर्षाचे वरील जेष्ठ नागरिक व दहा वर्षाचे आतील मुलांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. तरीदेखील आजही शहरात अनेक कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती व लहान मुले बिनधास्त पणे शहरात फिरताना दिसतात. तसेच सकाळी माॅर्निग वाॅक चे वेळी सुद्धा अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. मग चूकन काही झाले तर आपण प्रशासनावर खडे फोडून मोकळे होतो. खरंच मित्रांनो प्रशासन खुप चांगले काम करत आहे पण केवळ जनतेची पाहिजे तेवढी आणि पाहिजे तशी साथ प्रशासनाला मिळत नाही हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. खरंच मागे वळून पाहिले तर सगळ्यात प्रथम मुकुंदनगर हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर केला होते. परंतु आता तिथे एकही कोविड-19 चा पेशंट नाही. शहरातील ज्या ज्या भागात प्रशासनाने कंटेनमेंट झोन व हाॅटस्पाॅट जाहीर केले तेथील कोविड-19 संक्रमणाची साखळी तुटली आहे. केवळ आणि केवळ काही बेजबाबदार लोकांच्या बेफिकरपणे वागण्यामुळे आणि शासकीय सूचना व नियमाचे उल्लंघन केल्यामुळेच शहरात कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. एवढे होऊन सुद्धा आजही काही बेजबाबदार लोकच ऐकतच नाहीत. जास्त पैसे कमवण्याचे गैर उद्देशाने आजही बेकायदेशीर व्यवसाय सुरूच आहेत. पण प्रशासन या गैरकृत्याकडे डोळे झाक का करतेय हेच समजत नाही. प्रशासनाने केवळ केसेस करून हा प्रश्न सुटणार नाही तर जाग्यावरच दंड आकारला पाहिजे आणि तसे अधिकार कायद्याने प्रशासनास दिलेले आहेत. मग महापालिका प्रशासन फक्त केसेसच का दाखल करतेय? अगोदरच कोर्टात अनेक केसेस पेंडीग आहेत, त्याचाच निपटारा होण्यासाठी बराच वेळ जाणार आहे आणि त्यात नवीन दाखल करण्यात आलेल्या केसेस आहेतच. त्यामुळे फक्त केसेस दाखल करून काही उपयोग होईल असे नाही वाटत. सध्या जनतेला अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. मुख्य म्हणजे रोजगार उपलब्ध नसल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. अनेक कंपन्या व खाजगी  व्यावसायिक यांनी नोकर कपात केली आहे. तसेच रोज मजुरी करणारे लोकांना सुद्धा रोजगार नसल्याने ते सुद्धा अर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंब सांभाळायचे की अचानक उद्भवनारे आजारावर खर्च करायचा असा प्रश्न पडतो. त्यामुळे नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा. आपल्या परिवाराची काळजी घ्यावी हि विनंती आहे. कारण आता नागरिकांना स्वतः ची काळजी स्वतः च घ्यावी लागेल असे वाटते आहे. तरच आणि तरच आपले कुटुंब सुरक्षित राहील. त्यामुळे घरीच रहा सुरक्षित रहा.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News