निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलची निकालाची परंपरा कायम


निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलची निकालाची परंपरा कायम

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

सी.बी.एस.ई. बोर्डाचा १० वीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये निर्मल ब्राईट फ्युचर सी. बी. एस. ई. स्कूल व ज्यनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घव-घवीत यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा नुकताच निकाल लागला आहे. यामध्ये या ही वर्षी विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली आहे. विद्यालयातील विद्यार्थी तेजस कल्याण रुईकर या विद्यार्थ्याने ९३% गुण संपादन करून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला असून ऋत्विक दिपक अभंग याने ९१.८% गुण संपादन करून व्दितीय तर यश बाळासाहेब बनसोडे ९१.६% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला आहे. यापरीक्षेमध्ये विद्यालयातील एकूण ३८ विद्यार्थीनी परीक्षा दिली तर त्यामध्ये ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले तर उर्वरित विद्यार्थी विशेष प्राविण्यासह  उत्तीर्ण झाले आहेत. शेवगाव तालुक्यात या विद्यालयातील विद्यार्थी तेजस कल्याण रुईकर या विद्यार्थ्याने खुल्या प्रवर्गातून ९३% गुण संपादन केले. इतर मागास प्रवर्गातून ऋत्विक दिपक अभंग याने ९१.८ व अमन इम्रान शेख याने अल्पसंख्यांक प्रवर्गातून ८३ % गुण संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे समन्वयक प्रा. कैलास पोटे, प्राचार्य गणेश पालवे, उपप्राचार्य सतिश कुऱ्हे व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. विद्याधरजी काकडे व जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पैठण, शेवगाव व पाथर्डी या तालुक्यात निर्मल ब्राईट फ्युचर स्कूल व ज्यू. कॉलेज हे एकमेव सी.बी.एस.ई. बोर्डाचे मान्यता प्राप्त विद्यालय असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे यश कौतुकास्पद  व अभिमानास्पद आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News