तपोवन रोडचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आनण्यासाठी टक्केवारी-भज्ञाक सुर्यनामा आंदोलन


तपोवन रोडचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आनण्यासाठी टक्केवारी-भज्ञाक सुर्यनामा आंदोलन

स्पीक अहमदनगर स्पीक मोहिमेतंर्गत वेबीनार घेऊन रविवारी रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडे तीन कोटी रुपये खर्च करुन झालेल्या तपोवन रोडचे  काम निकृष्ट दर्जाचे झाले असताना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने रविवार दि.19 जुलै रोजी टक्केवारी-भज्ञाक सुर्यनामा आंदोलन करण्यात येणार आहे. तर स्पीक अहमदनगर स्पीक मोहिमेतंर्गत वेबीनार घेऊन प्रत्यक्ष तपोवन रस्त्यावर जावून झालेल्या भ्रष्टाचाराची शहानिशा केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

लॉकडाऊनपुर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तपोवन ते बोल्हेगाव 4.95 कि.मी. रस्त्याचे काम झाले. या कामासाठी साडे तीन कोटी रुपयाचा निधी आला. या निधीतून दर्जेदार काम होणे अपेक्षित होते. मात्र टक्केवारीमुळे या कामात मोठा भ्रष्टाचार होऊन रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले नाही. पावसाने या रस्त्यावर खड्डे पडले असून, नागरिकांच्या या रस्त्यासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. हा भ्रष्टाचार उघडकीस आनण्यासाठी स्वयंसेवी संघटनेच्या वतीने टक्केवारी-भज्ञाक सुर्यनामा आंदोलन करण्यात येणार आहे. स्पीक अहमदनगर स्पीक वेबीनार घेऊन सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, इंजीनिअर या रस्त्यासंदर्भात प्रतिक्रिया देणार आहेत. तर रस्त्याचा दर्जा तपासून झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आनण्याचे काम केले जाणार आहे. या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अशोक सब्बन, कॉ.महेबुब सय्यद, अर्शद शेख, हिराबाई ग्यानप्पा, शाहीर कान्हू सुंबे प्रयत्नशील आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News