खासगी हॉस्पिटल्स आणि प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या व्यक्तींना आयसोलेशन सेंटरमध्येच राहावे लागणार-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


खासगी हॉस्पिटल्स आणि प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या व्यक्तींना आयसोलेशन सेंटरमध्येच राहावे लागणार-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

होम क्वारंटाईन आढळल्यास कारवाई होणार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आदेश जारी

प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे , खाजगी रुग्‍णालये / प्रयोगशाळा (लॅब) व व्‍यक्‍तीना कोविड -19 च्‍या अनुषंगाने नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्‍यास ज्या व्यक्ती बाधित आढळतील अशा व्यक्तींना गृह विलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहता येणार नाही. अशा व्यक्ती होम क्वारंटाईन असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदीनुसार कारवाई करणेत येईल, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी  यांनी जारी केले आहेत. जिल्‍हयातील खाजगी रुग्‍णालये / प्रयोगशाळामध्‍ये कोविड - 19 तपासणीसाठी व्‍यक्‍तीचे स्‍वॅब घेण्‍यात येतात. सदर व्‍यक्‍ती कोरोनाने बाधित झाल्‍याचा अहवाल प्राप्‍त झाल्‍यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या अनुषंगाने सदर बाधित व्‍यक्‍ती आयसोलेशन सेंटरमध्ये तातडीने दाखल करुन त्‍यांच्‍यावर उपचार सुरु करणे व त्‍यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन त्‍याबाबत पुढील कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे साथ रोग अधिनियम 1897 अन्‍वये निर्गमित करण्‍यात आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या अनुषंगाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

       राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड -19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणुन घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी कऱण्यात आले आहेत.

     कोविड -19 चे अनुषंगाने, प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचा भाग म्‍हणून कोविड -19 चाचणी प्रयोगशाळांमध्‍ये जलदगतीने चाचणी व प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर केल्‍यास बाधित रुग्‍णांवर तातडीने उपचार करता येतील. त्‍यास्‍तव, अहमदनगर जिल्‍हयातील कोविड -19 चाचणी प्रयोगशाळा व वैदयकीय व्‍यावसायिकांसाठी सूचना निर्गमित केलेल्‍या आहेत.

      आज जारी केलेल्या आदेशानुसार, खासगी रुग्णालये आणि  प्रयोगशाळा यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये,  खाजगी रुग्‍णालये / प्रयोगशाळा (लॅब) यांना स्‍वॅब घेताना संबंधीत व्‍यक्‍तींचे SPO2 ची तपासणी करावी. स्‍वॅब घेतलेल्‍या व्‍यक्‍तींची माहिती व सदर व्‍यक्‍तीच्‍या तपासणीमध्‍ये SPO2 कमी असल्‍यास तातडीने ग्रामीण भागामध्‍ये तालुका आरोग्‍य अधिकारी व महानगरपालिका हद्दीमध्‍ये वैदयकिय आरोग्‍य अधिकारी, मनपा, अहमदनगर यांना कळविणे बंधनकारक आहे.  कोविड -19 पॉझिटीव्‍ह रुग्‍णांची माहिती व अहवाल ग्रामिण भागामध्‍ये तालुका आरोग्‍य अधिकारी व महानगरपालिका हद्दीमध्‍ये वैदयकिय आरोग्‍य अधिकारी, मनपा, अहमदनगर यांना कळविणे बंधनकारक आहे. तालुका आरोग्य अधिकारी व वैदयकिय आरोग्‍य अधिकारी, मनपा, अहमदनगर यांनी सदरील माहिती जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक, अहमदनगर यांना कळवावी.. तपासणी अहवालानुसार कोरोनाची बाधा झाल्‍याचे आढळून आलेल्‍या रुग्‍ण/ व्‍यक्‍ती यांना तातडीने स्‍वॅब घेतलेले खाजगी रुग्‍णालय, नजीकचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, अहमदनगर येथे किंवा इतर आयसोलेशन सेंटरमध्‍ये  भरती होणे बंधनकारक राहील.  तपासणी अहवालानुसार कोरोनाची बाधा झाल्‍याचे आढळून आलेल्‍या रुग्‍ण/ व्‍यक्‍ती यांना कोणत्‍याही परिस्थितीत गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) होता येणार नाही. होम क्वारंटाईन झाल्‍याचे आढळून आल्‍यास त्‍यांचेवर साथरोग अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्‍ण / व्‍यक्‍ती यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दरम्‍यान त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींची माहिती प्रशासनास देणे बंधनकारक राहील.

             कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदीनुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.     ***

जाहिरात
Search
विडिओ
Recent News