संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव -कोरोना महामारीच्या संकटकाळात अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली जनजागृती व समाजातील लोकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्रभूमीचे प्रतिनिधी संजय सावंत यांना श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने कोरोना योध्दा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
संजय सावंत यांनी कोरोना महामारीच्या संकटकाळात समाज जागृतीचे कार्य केले. तसेच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपले योगदान दिल्याबद्दल त्यांना हा सन्मान श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ गुलदगड, उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे, कोपरगाव तालुका अध्यक्ष अशोकजी माळवदे,कोपरगाव शहर अध्यक्ष शेखर बोरावके, उपाध्यक्ष संतोष रांधव,कार्याध्यक्ष डॉ.मनोज भुजबळ,सचिव योगेश ससाणे,संपर्क प्रमुख संदीप डोखे, शहर उपाध्यक्ष मनोज चोपडे, खजिनदार अनंत वाकचौरे यांनी सन्मानपुर्वक प्रदान केले.