मेंढपाळ बांधवांवर होणारे हल्ले थांबवून गाव गुंडावर कडक कारवाई करणेबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे कार्यकर्त्यांचे निवेदन


मेंढपाळ बांधवांवर होणारे हल्ले थांबवून गाव गुंडावर कडक कारवाई करणेबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे कार्यकर्त्यांचे निवेदन

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी:: महाराष्ट्रात मेंढपाळ बांधवांवर होणारे हल्ले वाढत असून त्यावर ठोस पावले उचलून गाव गुंडावर कठोर कारवाई करण्याविषयी दौंड पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक आणि तहसील कार्यालयात देण्यात आल्याचे संदीपान वाघमोडे यांनी सांगितले.निवेदनात नमूद केले आहे की महाराष्ट्रात या लॉक डाऊन काळात आमच्या मेंढपाळ बांधवांवर बऱ्याच ठिकाणी हल्ले झाले आहेत,त्यांना न्याय मिळावा हल्ले करणाऱ्या गाव गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सरकारने मेंढपाळ बांधवांसाठी नवीन कायदा लागू करावा, एट्रोसिटी कायद्यात सरक्षण द्यावे,यांच्या मुलांसाठी चालती शाळा सुरू करावी,गेल्या दोन तीन महिन्यात मेंढपाळ बांधवांवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून द्या,या सरकारने मेंढपाळ बांधवांसाठी नवीन कायदा करावा आणि त्यांना संरक्षण देण्याविषयी निवेदन दौंड पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय येथे देण्यात आले यावेळी संदीपान वाघमोडे,नामदेव राहिंज, संदिप वलेकर,तुषार येडे,राहुल मदने, संदिप दगडे, मयूर कोरडे,अजय माने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News