संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी:
कोरोना संसर्गजन्याच्या काळात तालुक्यातील तसेच शहरातील नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी रात्रदिवस झटना-या कोरोना योद्धांचा कोपरगाव येथील श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याची माहिती संत सावता माळी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर विभाग ) मुकुंद मामा काळे यांनी दिली .
देशासह राज्यात कोरोनाचा विळखा अधिळच घट्ट झाला असुन बाधीतांची संख्या लाखोंच्या पार गेली आहे प्रशासनाच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी जिवाची पर्वा न करता या संकटाचा सामान करत आहेत.
अहमदनगर जिल्हातील इतर तालुक्यांचा तुलनेत कोपरगाव शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत याचे सर्व श्रेय येथील कोरोना योद्धांचे आहे.प्रसंगी जिवाची पर्वा न करता लढणाऱ्या या योद्धांना त्रिवार मुजुरा केला असुन श्री संत सावता माळी युवक संघ व समस्त माळी समाजाच्या वतीने ग्रामीण रूग्णलयाचे अधीक्षक मा.श्री. डाॅ.के.डी.फुलसौंदर- वैद्यकीय अधिक्षक कोपरगाव,मा श्री. जितेंद्रजी बोरसे कनिष्ठ अभियंता महावितरण कार्यालय संवत्सर.मा.श्री.डाॅ.अरुणजी भांडगे,मा.श्री.डाॅ विनयजी गिडगे,मा.श्री.डाॅ प्रकाशजी सुळे,मा.श्रीे.देवशजी माळवदे (पोलीस पाटील धोत्रे)मा.श्री.प्रितेशजी ससाणे(मेडिकल)मा.सौ.साधनाताई गवारे(सरपंच धोत्रे)मा.श्री.संतोषजी बनसोडे (मेडीकल)मा.श्रीमती सुमनताई शिंदे(स्वच्छता कर्मचारी ग्रा.पं.धोत्रे) यांना कोरोना योध्दे म्हणून सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी महात्मा फुले मंडळ अध्यक्ष कोपरगाव प्रदीपजी नवले,जिल्हा अध्यक्ष उत्तर अहमदनगर मुकुंद मामा काळे,कोपरगाव तालुका अध्यक्ष अशोकजी माळवदे,कोपरगाव शहर अध्यक्ष शेखर बोरावके,उपाध्यक्ष संतोष रांधव,कार्यध्यक्ष डाॅ.मनोज भुजबळ,सचिव योगेश ससाणे,संपर्क प्रमुख संदीप डोखे,शहर उपाध्यक्ष मनोज चोपडे,खजिनदार अनंत वाकचौरे सुनिल मंडलीक आदी उपस्थित होते.