15 जुलै बुवा साळवींचा जन्मदिवस कबड्डी दिन-राजेंद्र सोनवलकर


15 जुलै बुवा साळवींचा जन्मदिवस कबड्डी दिन-राजेंद्र सोनवलकर

 बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

15 जुलै हा दिवस महाराष्ट्रात कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. 15 जुलै  शंकरराव साळवींचा जन्मदिवस.1990 च्या दशकात आशियामध्ये शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या प्रयत्नामुळे कबड्डी हा खेळ सामिल झाला. 1990 ला बिजींग येथे पार पडलेल्या एशिआई स्पर्धांपासुन एशियात कबड्डीला समाविष्ट करण्यात आले. या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात महाराष्ट्राचा फार मोठा हात आहे. आणखीन एक विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे कबड्डी हा एकमेव असा खेळ आहे की या खेळात पुरूष आणि महिला अश्या दोनही भारतिय संघांनी विश्वकप जिंकला आहे.

   पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. हा खेळ मातीमध्ये जास्त प्रमाणात खेळला जातो. चढाया करताना कब्बडी हा शब्द खेळाडूस सलग उच्चारावा लागतो.जर असे आपण केले नाही तर आपल्याला फाउल करतात.

  ज्यांनी कबड्डी सातासमुद्रापार पोहचवली. अशा बुवा साळवींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग आहेत. त्यापैकी महत्त्वाचा प्रसंग म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांना एकदा विचारले की, तुम्हाला काय पाहिजे तर आयुष्यभर भाड्याच्या खोलीत राहणारे बुवा साळवी यांनी सांगितले की मला काही नको कबड्डी असोशियनसाठी फक्त जागा द्या. अशा थोर बुवा साळवींचा जन्मदिवस महाराष्ट्रात कबड्डी दिन म्हणून पाळला जातो असे मत कबड्डी समालोचक राजेंद्र सोनवलकर यांनी यावेळी व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News