दौंड शहरावर कोरोनाचे वादळ घोंगावतय,दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोरोनाची एंट्री


दौंड शहरावर कोरोनाचे वादळ घोंगावतय,दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोरोनाची एंट्री

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी::दौंड शहरात दोन दिवस कोरोना विषयी चांगल्या बातम्या येत होत्या,जेवढे स्वाब पाठवले होते ते सर्व निगेटिव्ह आले होते,दोन दिवसाच्या या सुखमय वातावरणानंतर दौंड शहरात पुन्हा कोरोणाचे वादळ घोंगावू लागले आहे, दौंड शहरातील 42 जणांचे स्वाब पाठवण्यात आले होते त्यापैकी आठ व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याचे उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले.यामध्ये सात पुरुष आणि एक महिला आहे,मुख्य बाजारपेठेत रुग्णांच्या माध्यमातून कोरोनाची एंट्री झाली असल्याने दौंडकर नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे,जनतेनेच स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे,प्रशासन,पोलीस सांगतात म्हणून घरी थम्मबू नका,स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या,कारण कोविड सेंटर फुल होत आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News