थोडसं मनातलं.... "नेटक-यानो सावधान, तुमच्यावर सायबर क्राईम सेल चे लक्ष आहे".... ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडसं मनातलं....   "नेटक-यानो सावधान, तुमच्यावर सायबर क्राईम सेल चे लक्ष आहे"....  ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रहो, 

सध्या करोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर जोरदार थैमान घालतोय. त्याची पाळमुळं देशातील प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात पसरलेली आहेत.अगदी अहमदनगर चे पहायचे असेल तर कोरोना ग्रस्तांची  संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा वेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या काही महत्वाच्या भूमिका आणि निर्णय असतात आणि प्रशासन त्या त्या वेळोवेळी सर्व नियम जाहीर करत असते. अर्थात काही राजकीय  पक्ष काही चुकीचे निर्णयाचे बाबतीत राजकीय विरोध करतातच या बाबतीत दुमत नाही परंतु सध्या ही वेळ राजकारण करण्याची नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा. 

परंतु सध्या काही नेटकरी मंडळी व्हाॅटस अप आणि फेसबुक व इतर समाजमाध्यमावर कोणत्याही प्रकारची ठोस व अधिकृत माहिती नसताना  विनाकारण वादग्रस्त पोस्ट व्हायरल करत आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, नेटक-यानो सायबर पोलिस प्रशासन ची कडक नजर तुमच्यावर आहे. आपल्याला माहित नसताना सुद्धा केवळ कोणाच्याही तक्रारीवरून बेजबाबदार नेटक-याचे विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे.  तेव्हा नेटक-यानी सावधान रहावे ही विनंती. मित्रांनो अहमदनगर चे पोलिस खाते किती सतर्क आहे याचे उदाहरण आपल्याला काही दिवसांपूर्वी नक्कीच पहायला मिळाले आहे. अहमदनगर पोलिस प्रशासनाने अहमदनगर मधून दिल्लीच्या तबलिकी व मर्कजचा चा तपास लावला होता. तसेच सायबर सेल ने अनेक अर्थिक गुन्हे सुद्धा उघडी केली आहेत.  त्या बाबतीत जिल्हा पोलीस दलाचे व सायबर सेल चे नक्कीच अभिनंदन करायलाच पाहिजे. अहमदनगर शहरात दररोज कोरोना थैमान घालतोय आणि दिवसेंदिवस कोविड-19 बाधीत रूग्णाची ची संख्या वाढतच आहे. कोविड-19 चा प्रदुर्भाव टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी चांगली भूमिका घेऊन उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कोरोना पासुन मुक्त होण्याचे प्रमाणही चांगले असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. सध्या सरकारने कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी 31 जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे व सिलबंद केला तसेच सायंकाळी 7 ते सकाळी 5 पर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे आणि सर्व व्यवहार हे सकाळी 9 ते सायंकाळी  5 वाजेपर्यंत सुरू रहातील असे अधिकृत पणे जाहीर केले आहे. तरीदेखील असे असताना सुद्धा काही अतिशहाणपणा असलेली मंडळी समाजमाध्यमातुन लाॅकडाऊन व संचारबंदी बाबतीत  वेगवेगळ्या स्वरूपात आफवा पसरवतातच. तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळी विरूध्द जोक स्वरूपात टिका टिपण्णी करताना दिसतात. वास्तविक आपण समाजमाध्यमावर कोणत्याही प्रकारची पोस्ट टाकताना किंवा फाॅरवर्ड करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या कोविड-19 च्या काळात सर्व समाजमाध्यमावर  सायबर क्राईम बारिक लक्ष ठेवूनच आहेच. नागरिकांनी आपल्या व्हाॅटस अप  ग्रुप वर अथवा वैयक्तिक व्हाॅटसअप अथवा फेसबुक वर आलेला वादग्रस्त पोस्ट कोणत्याही प्रकारची खात्री न करताच इतर सर्व व्हाॅटस अप ग्रुप अथवा फेसबुक वर व्हायरल करतात. समाजमाध्यमावर असलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की, कोणत्याही प्रकारचा मजकूर खात्री केल्या शिवाय इतरांना पाठवू नका. त्याचे होणारे परिणाम तुम्हाला निश्चितच भोगायला लागतील यात शंकाच नाही . समाजमाध्यमाचा वापर हा इतर खुप काही चांगल्या गोष्टी साठी पण करता येईल ना. विनाकारण आपल्यावर गुन्हा दाखल होईल असे मजकूर पोस्ट करू नका हि विनंती. कारण आजकाल कुणाच्याही भावना कधीही दुखावल्या जातात याचा काही नेम नसतो . तेव्हा समाजमाध्यमचा वापर करताना  नेटक-यानी याची काळजी घ्यावी हि विनंती. शेवटी तुमची इच्छा. तुम्ही समजदार आणि सुजाण नागरिक आहात. तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की, आपला जीव वाचवण्यासाठी जिल्हा  प्रशासन आणि पोलिस प्रशासन,  महापालिका प्रशासन, डाॅक्टर आणि नर्स, सफाई कर्मचारी,  लोकप्रतिनिधी, पत्रकार मंडळी, समाजसेवक आणि इतर कोरोना योद्धे हे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. अनेक कोरोना योद्धे बळी गेले आहेत याची जाणीव आता आपणच ठेवली पाहिजे. सध्या अहमदनगर शहरात  कोरोना बाधीत रूग्ण जास्त प्रमाणात सापडले आहेत ही जरी सत्यता असली तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अथक प्रयत्नशील कामामुळेच अनेक रूग्ण बरे झाले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु काहीनी अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाॅकडाऊन व संचारबंदी जाहीर होत आहे अशा स्वरूपाचे मजकूर व्हायरल करून याबाबतीत समाजमाध्यमावर अनेक वेगवेगळ्या चुकीच्या आफवा पसरविल्या आहेत. वास्तविक जिल्हा  प्रशासन त्यांचे आदेश पारीत करताना लेखी स्वरुपात पारीत करत असते. तसेच सर्व जनतेला निश्चितच त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच आणि सर्व अधिकारी व शहरातील लोकप्रतिनिधी यांचे बरोबर चर्चा करूनच निर्णय घेत असते आणि तो निर्णय सर्व वर्तमान पत्रात छापून येतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे व खबरदारी घेणे आवश्यक आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे.    प्रशासन यांनी घालून दिलेले नियम व सूचनाचे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती आहे. घरा बाहेर पडू नये हि विनंती. काळजी घ्यावी हि विनंती.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News